ऑटो एक्सपो 2020 / भारतात लवकरच येणार ग्रेट वॉल मोटर्सची R1 इलेक्ट्रिक कार, चीनमध्ये कारची किंमत 8 लाख रुपये

  • सिंगल चार्जिंगमध्ये ही कार 350 किमीपर्यंत धावते, 10 तासांत होते पूर्ण चार्ज
  • या कारच्या केबिन सेंटरमध्ये राउंड शेप नॉब आहे, ज्याद्वारे गाडीचे मोड बदलतात

दिव्य मराठी

Feb 11,2020 04:41:20 PM IST

अर्पित सोनी

ऑटो एक्सपो - चीनी कंपनी ग्रेट वॉल मोटर्सने ऑटो एक्सपो 2020 मध्ये GWM R1 ही इलेक्ट्रिक कार सादर केली. कंपनी पुढील वर्षापर्यंत ही कार भारतीय बाजारात लॉन्च करू शकते. आपल्या कॉम्पॅक्ट लुक आणि कलर कॉम्बिनेशनमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. कारची रेंज सिंगल चार्जिंगमध्ये 350 किलोमीटर आहे. स्टँडर्ड चार्जरने या कारला घरीच चार्ज करू शकता. स्टँडर्ड चार्जरने चार्ज होण्यास 10 तास वेळ लागतो. सध्या शो मध्ये कंपनीने कारचे इंटरनॅशनल मॉडल सादर केले आहे, ज्यामध्ये लेफ्ट साइड ड्रायव्हिंग स्टाइल दिले होते. सध्या कंपनीने याची लॉन्चिंग तारीख आणि किमतीविषयी कोणतीही घोषणा केलेली नाही. चीनमध्ये कारची किंमत अंदाजे 8 लाख रुपये आहे. भारतातही याच किमतीत कार उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

GWM R1 चे डुअल कलर कॉम्बिनेशन गाडीला फंकी लुक देते

  • गाडीच्या लुक्सविषयी बोलायचे झाल्यास, कार दिसायला अगदी साधी आणि क्लासिक दिसते. ही कंपनीची प्रीमियम इलेक्ट्रिक कार असू शकते. कंपनीने याला डुअल कलर कॉम्बिनेशन दिले आहे, जो फंकी वाटतो.
  • यामध्ये राउंड शेप हेडलँप्स दिले आहेत, या हेडलँप्समध्ये चार्जिंग पोर्ट मिळणार आहे. ज्यामध्ये स्टँडर्ड आणि फास्ट चार्जिंगची सुविधा मिळेल. कारचे इंटीरियर बेसिक आणि नीट एंड क्लीन आहे. यामध्ये कमी बटण देण्यात आले आहेत.
  • स्टीअरिंग व्हील ओल्ड-स्कूल डिझाइनचे आहे, ज्यावर काही कंन्ट्रोल्स मिळतील. कारचे सीट्स चांगलाच प्रीमियम फील देतात. कारच्या भारतीय व्हर्जनमध्ये देखील अशाप्रकारचे एलिमेंट्स पाहायला मिळतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
  • कारमध्ये गिअरच्या जागी राउंड शेप नॉब देण्यात आला आहे. ज्याद्वारे कारला न्यूट्रल, रिव्हर्स आणि ड्राइव्ह मोडमध्ये आणता येते. यामध्ये 33kWh कॅपॅसिटीची लिथियम आयन बॅटरी मिळले, ज्याद्वारे यामध्ये 35kW ची पीक पावर आणि 125Nmचा टॉर्क मिळतो. कारची टॉप स्पीड 102 किमी प्रतितास आहे.
  • स्टँडर्ड चार्जरद्वारे बॅटरी चार्ज व्हायला 10 तास आणि फास्ट चार्जरद्वारे 80% चार्ज होण्यास 40 मिनिटांचा वेळ लागतो.
X
COMMENT