ऑटो एक्सपो 2020 / सुझुकीने सादर केली मोस्ट अवेटेड एसयूव्ही जिमनी, भारतात महिंद्रा आणि फोर्स गुरखाला देईल टक्कर

ही गाडी भारतात लॉन्च झाली तर यामध्ये अनेक बदल पाहण्यास मिळतील
 

दिव्य मराठी वेब टीम

Feb 10,2020 02:58:00 PM IST

ऑटो डेस्क - मारुती सुझुकीने आपले मोस्ट अवेटेड एसयूव्ही जिमनीला ऑटो एक्सपो 2020 मध्ये सादर केले. ही एसयूव्ही आपल्या ऑफरोडिंग कॅपेबिलिटी आणि बॉक्सिंग बॉडी स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. कंपनीने सध्या याची लॉन्चिंग डेट आणि किमतीबाबत कोणतीही घोषणा केली नाही. या मेळाव्यात बऱ्याच दिवसांपासून आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये असलेल्या या गाडीच्या तीन डोर मॉडलला सादर केले. शोमध्ये जिम्नीचे आगमन झाल्यानंतर ही कंपनी लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या गाडीला जिप्सीची रिप्लेसमेंट म्हणून पाहिले जात आहे. त्याचबरोबर या गाडीची भारतीय बाजारपेठेत महिंद्रा थार आणि फोर्स गुरखा सोबत टक्कर पाहण्यास मिळेल. या गाडीच्या भारतीय व्हर्जनमध्ये 5 दरवाजांसह इतर मोठे बदल पाहण्यास मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


एक्सपोत जंगल ग्रीन कलच्या जिमनी कारला शोकेस करण्यात आले. तर याचे इंटीरिअरमध्ये सुद्धा अनेक ग्रीन एलिमेन्ट्सचा वापर करण्यात आला आहे. गाडीच्या चारही बाजुंना काळ्याच रंगाची स्कर्ट देण्यात आली आहे. या गाडीमध्ये अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटीला लक्षात ठेवून डिझाइन केलेले मोठे बंपर दिले आहे. क्लिअर आणि वाइड व्ह्यू साठी एसयूव्हीमध्ये मोठ-मोठ्या विंडो देण्यात आल्या आहेत. सध्या या शो मध्ये जिमनीचे आंतरराष्ट्रीय मॉडल सादर केले आहे. ही गाडी भारतात लॉन्च झाली तर यामध्ये अनेक बदल पाहण्यास मिळतील. विशेषत: त्याच्य़ा व्हीलबेस बदलले जाईल. भारतात या गाडीचे सेकंड जनरेशन मॉडल लॉन्च केले जाऊ शकते. ज्यामध्ये जिप्सीसारखेच व्हीलबेस मिळेल. याची किंमत अंदाजे 10 लाख रुपये असू शकते.

X
COMMENT