आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मारुती सुझुकीने 10 गाड्यांच्या किंमतीत केली 5 हजार रुपयांची कपात; नवे दरही लागू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मारुती सुझुकीने आपल्या 10 कारच्या एक्स-शोरूम किमतीत 5 हजार रुपयांची कपात केल्याची माहिती बुधवारी दिली. सरकारने कॉर्पोरेट टॅक्स कपात केल्याचा फायदा ग्राहकांना व्हावा यासाठी कारच्या किमतीत कपात केल्याचे कंपनीने सांगितले.  कारच्या किमती कमी केल्यानंतरच्या नवीन किंमती लागू देखील करण्यात आल्या आहेत. 

मध्यमवर्गीय ग्राहकांना कार खरेदी करणे सोपे होईल - मारुती
मारुतीने सांगतिले की, उपलब्ध असलेल्या ऑफर्स व्यतिरिक्त ही कपात करण्यात आली आहे. तसेच कॉर्पोरेट टॅक्सच्या कपातीचा फायदा ग्राहकांसोबत शेअर करण्यासाठी स्वतःहून किमती कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनीने सांगितले. यामुळे मध्यमर्गीय ग्राहकांना कार खरेदी करणे सोपे होईल. यामुळे सणासुदीच्या काळात मागणीत वाढ होण्याची कंपनीला अपेक्षा आहे. 
 

या कारच्या किमतीत केली कपात 
मारुतीने आपल्या ऑल्टो 800, ऑल्टो के 10, स्विफ्ट डीझेल, सेलेरियो, बलेने डीझेल, इगनिस, डिझायर डिझेल, टूर एस डीझेल, विटारा ब्रेझा आणि एस क्रॉसच्या सर्व व्हेरियंटच्या किमतीत कपात केली आहे.

सरकारने 22% केला कॉर्पोरेट टॅक्स
सरकारने गेल्या आठवड्यात भारतीय कंपन्यांसाठीचा कॉर्पोरेट टॅक्स 22% करण्याची घोषणा केली होती. याअगोदर हा टॅक्स 30 टक्के होता. टॅक्स कमी केल्यामुळे  कंपनीच्या नफ्यात वाढ होणार आहे. मारुतीच्या निर्णयानंतर ऑटो आणि इतर क्षेत्रातील कंपन्या देखील कॉर्पोरेट टॅक्समधील कपातीचा फायदा ग्राहकांसोबत शेअर करतील अशी आशा आहे. 

बातम्या आणखी आहेत...