आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहैदराबाद- शहरात भरदिवसा एका व्यक्तीवर चाकूने वार करुन हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या होत असताना तिथून जाणाऱ्या लोकांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यावेळी कोणीही आरोपीला रोकण्याची हिम्मत केली नाही. अब्दुल खाजा असे या आरोपीचे नाव असून शकीर कुरेशी मृताचे नाव आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून तो व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ऑटो रिक्शा चालवत होता मृत शकीर कुरेशी
पोलिसांनी सांगितल्यानूसार, शकीर कुरेशीकडे अनेक ऑटो रिक्शा असून तो या रिक्शा भाड्याने चालवण्यासाठी देत होता. तर आरोपी अब्दुल रिक्शा ड्रायव्हर होता. पोलिस अधिक्षक अंबेर किशोर यांनी सांगितल्यानूसार, आरोपी अब्दुलला घटनास्थळीच अटक करण्यात आली आहे. चौकशीत समोर आलेल्या माहितीनूसार मृत शकीर कुरेशीने आरोपी अब्दुलला आपली रिक्शा भाड्याने दिली होती. परंतू आरोपी अब्दुलने ती रिक्शा दुसऱ्याला भाड्याने दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर वाद अधिकच विकोपाला गेल्याने आरोपीने अब्दुलवर चाकूने हल्ला करुन मृत शकीरची हत्या केली.
लोक घेत होते बघ्याची भूमिका, पोलिसांनीही केली नाही हिम्मत
ही हत्या होत असताना घटनास्थळावर मोठी गर्दी जमली होती. परंतू लोकांनी बघ्याची भुमिका घेत सर्वजण या हत्येचा व्हिडिओ आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड करण्यात व्यस्त होते. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी उपस्थित झाले परंतू कोणीही आरोपीला रोखण्याची हिम्मत दाखवली नाही. एका वाहतूक हवालदाराने आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला परंतू तोही मागे सारत मृताला वाचवू शकला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.