Home | Maharashtra | Vidarva | Akola | Auto riksha driver abuses little boy

अकोटला ऑटोरिक्षा चालकाचा बालकावर अनैसर्गिक अत्याचार

प्रतिनिधी | Update - Dec 09, 2018, 09:37 AM IST

आरोपीला दहा डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी, घरी पोहोचवून देण्याचे आमिष

  • Auto riksha driver abuses little boy


    अकोट- शहरातील एका १५ वर्षीय मुलाला घरी पोहोचून देतो असे म्हणून ऑटो चालक मो. नसीम मो. शफिक(वय २७) हा ऑटो पोपेटखेड मार्गावर घेऊन गेला. तिथे बालकासोबत अनैसर्गिक कृत्य केले. सदर घटना ६ डिसेंबरच्या रात्री घडली. न्यायालयाने आरोपीला १० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली.


    घटनेची हकिकत पीडित मुलाने पालकांना दिली. त्यानंतर अकोट ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून ऑटो चालकाला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली. शहर व ग्रामीण पोलिसांनी शहरातील इफ्तेखार प्लॉट येथून मो. नसीम मो. शफिक याला अटक केली. त्याला अकोट न्यायालयासमोर उभे केले. अशी माहिती ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे यांनी दिली. या वेळी ठाणेदार मिलिंदकुमार बहाकार व शहर पो.स्टे. चे ठाणेदार संतोष महल्ले हजर होते. ही कारवाई पीएसआय अनुराधा पाटेखेडे, नारायण वाडेकर, गजानन भगत, सुनील फोकमारे, प्रवीण गवळी, अनिल सिरसाट, नंदू कुलट, राजेश कोहरे, राजेश जोंधळकर, रामेश्वर भगत यांनी केली.
    अनैसर्गिक अत्याचार प्रकरणातील आरोपीसह अकोट पोलिसांचे पथक.

Trending