आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीनगर - जम्मू आणि काश्मीरात वाढती बर्फवृष्टी आणि हिमस्खलनात तीन जवान शहीद झाले आहेत. कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये ही घटना घडली असून यात आणखी एक जवान बेपत्ता आहे. हिमस्खलनात माछिल येथील लष्कराचे ठिकाण बर्फाच्या ढिगाराखाली गेले. दुसरीकडे, मध्य कश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातील कुलान गावात हिमस्खलनात 5 नागरिकांचा जीव गेला आहे. यासोबतच, रामपूर आणि गुरेज सेक्टरमध्ये सुद्धा हिमस्खलनाच्या घटना समोर आल्या आहेत.
या व्यतिरिक्त काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यात सुद्धा कुलान गावामध्ये हिमस्खलनाची घटना घडली. या ठिकाणी 5 नागरिकांचा ढिगाराखाली दबून जीव गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सोबतच, आस-पासच्या अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. स्थानिकांना देखील बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहेत. हा परिसर दळण-वळणाच्या साधनांपासून दूर असल्याने बचाव पथकाला सुद्धा पायी यावे लागते. उल्लेखनीय बाब म्हणजे, 3 डिसेंबर 2019 रोजी नियंत्रण रेषेजवळ हिमस्खलन झाले होते. त्या घटनेत 4 जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. हे सर्व जवान गस्तीवर गेले असताना दुर्घटना घडली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.