बॉक्स ऑफिस : पहिल्या दिवशी 'अॅव्हेंजर्स एंडगेम'ने भारतात कमवले 52 कोटी, बनली भारतातील तीसरी सर्वात मोठी ओपनर फिल्म

'ठग्स ऑफ हिंदुस्तान' पासून राहिली मागे... 

दिव्य मराठी

Apr 28,2019 01:24:00 PM IST

हॉलीवुड डेस्क : मार्वलची सुपरहीरो सीरीज अॅव्हेंजर्स एंडगेम 26 एप्रिलला रिलीज झाली. भारतात फिल्म रिलीजपूर्वीच तिकिटांचे जबरदस्त बुकिंग झाले होते. तर रिलीजच्या पहिल्याच दिवशी फिल्मने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, फिल्मने पहिल्याच दिवशी भारतात 52 कोटींची कमाई केली. भारतात चार भाषांमध्ये हिन्दी, तामिळ, तेलगु आणि इंग्रजीमध्ये रिलीज केली जाणार आहे.

'ठग्स ऑफ हिंदुस्तान' पासून राहिली मागे...
या फिल्मने भारतात सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये आपले नाव सामील केले आहे. या फिल्मने मुंबईमध्ये 14 कोटी रुपये आणि दक्षिण भारतात 16 कोटींची कमाई केली आहे. मात्र ही फिल्म आमिर खानच्या 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' पेक्षा मागे राहिली. आमिरच्या फिल्मने पहिल्या दिवशी 52.25 कोटींची कमाई केली होती. 'ठग्स ऑफ हिंदुस्तान'ने बाहुबली फिल्मचा रिकॉर्ड मोडला. मात्र भले आमिरची फिल्म फ्लॉप ठरली असेल पण या फिल्मने भारतात सरावात जास्त कमाई केल्याचा रेकॉर्ड बकाणावला आहे.

सर्वात जास्त गतीने कमवले 100 मिलियन...
फिल्मने जगभरात 1,186 कोटी रुपयांचे कलेक्शन करून जबरदस्त सुरुवात केली आहे. डेडलाइनच्या रिपोर्टनुसार, दोन दिवसात फिल्मने जगभरात 2,130 कोटी रुपये कमवले. सोबतच ही फिल्म जगातील सर्वात जास्त गतीने 100 मिलियन डॉलर कमवणारी पहिली फिल्म बनली आहे. अॅव्हेंजर्सने 17 तासातच हा विक्रम बनवला आहे.

हे आहेत फिल्ममधील मुख्य भूमिका...
'अॅव्हेंजर्स एंडगेम' डायरेक्टर जोडी एंथनी रूसो आणि जो रूसोने डायरेक्ट केले आहे. यामध्ये रॉबर्ट डाउनी जूनियर (आयरन मॅन), क्रिस इवान्स (कॅप्टन अमेरिका), मार्क रूफैलो (हल्क), क्रिस हेम्सवर्थ (थोर), स्कारलेट योहानसन (ब्लैक विडो), जेरेमी रेनर (हॉक आई), पॉल रूड (एंट मैन), ब्री लार्सन (कैप्टन मारवल) आणि जोश ब्रोलिन (थोनस) लीड रोलमध्ये आहेत.

X