आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Avengers Endgame' Has Became Highest Grossing Film And Break The Record Of 'Avatar'

'अॅव्हेंजर्स एन्डगेम' ठरला सर्वाधिक कमाई करणारा पहिल्या क्रमांकाचा चित्रपट, 'अवतार' चित्रपटाला पछाडून केला विक्रम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : डिस्नीच्या अॅव्हेंजर्स एंडगेम या चित्रपटाने या रविवारी आणखी एक रेकॉर्ड मोडला तो म्हणजे सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपट 'अवतार' चा. अॅव्हेंजर्स एन्डगेम या चित्रपटाने या रविवारी $2.790.2 अब्ज एवढी कमाई केली तर तर 2009 साली 'अवतार'ने $2,789.7 अब्ज एवढी कमाई केली होती. 'अवतार' हा आतापर्यंतच सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट होता. अॅव्हेंजर्सने मात्र आता हा रेकॉर्ड मोडला आहे.  

 

क्रिस हेमस्वर्थ म्हणजेच चित्रपटातील थॉर याने या यशासाठी आपल्या टीमला खूप शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, “जगातील त्या सर्व चाहत्यांचे खूप खूप धन्यवाद ज्यांनी Avengers Endgame ला हा ऐतिहासिक क्षण दिला आणि चित्रपट सर्वाधिक कमावणारा चित्रपट ठरला आहे.”