आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवाई घोटाळा? राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना ईडीकडून समन्स, 6 जून रोजी हजेरीचे आदेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई / नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच माजी केंद्रीय केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना अंमलबजावणी संचलनालयकडून (ईडी) समन्य बजावण्यात आले आहेत. त्यानुसार, पटेल यांना 6 जून रोजी ईडी कार्यालयात हजर व्हावे लागणार आहे. यूपीए सरकारमध्ये ते नागरी उड्डयन मंत्री पदावर कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात कथित हवाई घोटाळा प्रकरणी चौकशी करण्यासाठी बोलावण्यात आले असे सांगितले जात आहे. ईडीच्या चौकशीला आपण पूर्णपणे सहकार्य करणार आहोत असे पटेल यांनी स्पष्ट केले आहे.

 

काय आहे प्रकरण?
> वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पटेल यांच्यावर आरोप आहेत की त्यांनी हवाई घोटाळ्यातील मुख्य आरोपी दीपक तलवार आणि त्यांचा मुलगा आदित्य यांच्याशी जवळिक साधली होती. ईडीकडे दीपक तलवार आणि पटेल यांच्यात झालेल्या ई-मेल संभाषणाचे पुरावे देखील आहेत. दीपक तलवारने उड्डयन मंत्रालयात असलेल्या कॉन्टॅक्ट्सच्या बळावर परदेशी एअरलाइन्स कंपन्यांना फायदा मिळवून दिला होता. यासाठी त्याला मोठी रक्कम मिळाली होती. दीपकवर मनी लॉन्ड्रिंगचे आरोप देखील लागले आहेत.
> ईडीने या प्रकरणात दीपक आणि आदित्यच्या विरोधात आधीच आरोपपत्र दाखल केले आहे. दीपकचे याचवर्षी दुबईतून भारतात प्रत्यर्पण करण्यात आले आहे. तो तेव्हापासूनच अटकेत आहे. तर आदित्यच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. तो सध्या अॅण्टीग्वामध्ये असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, काही अधिकाऱ्यांनी म्हटले होते, की दीपक तलवार आणि प्रफुल्ल पटेल यांची चांगली मैत्री आहे. एव्हिएशन घोटाळ्याचा तपास करताना सीबीआयने ऑगस्ट 2017 मध्ये एफआयआर दाखल केला होता. तेव्हापासूनच ईडी सुद्धा या प्रकरणाची चौकशी करत आहे.

बातम्या आणखी आहेत...