आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Aviation Minister Hardeep Singh Puri On Air India, Says Difficult To Run Air India Airline

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एअर इंडियाला विकल्याशिवाय पर्याय नाही, कंपनी चालवणेही अवघड झाले आहे - सरकार  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले, कर्मचाऱ्यांसोबत अन्याय होणार नाही
  • 'जो कोणी एअरलाइनला विकत घेईल, त्याला प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची गरज पडेल'

नवी दिल्ली - सरकारी मालकीच्या एअर इंडियाची विक्री न केल्यास ही कंपनी चालवणे कठीण हाेऊन जाईल, परंतु खासगीकरण हाेईपर्यंत राेजगार गमावण्याची चिंता करण्याची मुळीच गरज नाही, असे उड्डयनमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी बुधवारी राज्यसभेत स्पष्ट केले. वरिष्ठ सभागृहात पुरवणी प्रश्नावरील उत्तरात सिंग यांनी सरकारची भूमिका मांडली. एअर इंडियात वेळेवर वेतन न मिळाल्याने अनेक वैमानिकांनी एअरलाइनला साेडचिठ्ठी दिल्याचा दावाही मंत्र्यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले, एअर इंडियाच्या वैमानिकांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली जात आहे. त्यांच्या पगारीचीही चिंता करण्याची गरज नाही. माझ्या माहितीप्रमाणे कोणीही राजीनामा दिलेला नाही, असा दावा त्यांनी केला. भाजपचे खासदार किशोरीलाल मीणा यांनी विचारलेल्या प्रश्नावर पुरी यांनी ही माहिती दिली. कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याची तक्रार मीणा यांनी केली होती. कर्मचाऱ्यांचा २५ टक्के पगारीचा प्रश्नही खासगीकरण किंवा निर्गुंतवणुकीपूर्वी सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर खासगीकरण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही कर्मचाऱ्यावर नोकरी गमावण्याची वेळ येणार नाही, असे आश्वासन पुरी यांनी सभागृहात दिले. कंपनीचे खासगीकरण न केल्यास कंपनीला टाळे लावण्याची वेळ येईल, असे स्पष्ट केले.

गेल्या काही वर्षांत खर्चात वाढ
एअर इंडियाच्या खर्चात गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. २०१६-१७ मध्येे २२०४८. ६८ कोटी , २०१७-१८ मध्ये २४६६१. ७७ व २०१८-१९ मध्ये ३०१९४.०६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. कंपनीच्या संचलनातील खर्चामागे इंधन दरवाढ, प्रतिस्पर्ध्यांच्या संख्येत वाढ, विमानतळ प्रभार, विनिमय दरातील तफावतीचा प्रतिकूल परिणामही दिसून आला आहे. २०१८-१९ मध्ये ९८०० उड्डाणे एक तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळासाठी विलंबाने झाली, अशी माहिती पुरी यांनी एका प्रश्नावर बोलताना दिली.

बातम्या आणखी आहेत...