ऑलिम्पिक / अविनाशला ऑलिम्पिकचे तिकीट; ठरला दुसरा महाराष्ट्रीयन धावपटू


बीडच्या अविनाश साबळेने पुरुषांच्या ३ हजार मीटर स्टिपलचेसमध्ये गाठले १३ वे  स्थान

वृत्तसंस्था

Oct 06,2019 08:56:00 AM IST

दोहा - महाराष्ट्रामधील बीडचा गुणवंत लांब पल्ल्याचा धावपटू अविनाश साबळेने पुढच्या वर्षी होणाऱ्या टोकियोतील अाॅलिम्पिक वारीसाठी तिकीट मिळवले. त्याने दोहा येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अव्वल कामगिरी करत अाॅॅलिम्पिक स्पर्धेतील अापला प्रवेश निश्चित केला.

अाता तो पुरुषांच्या ३ हजार मीटर स्टिपलचेस प्रकारात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार अाहे. तो स्टिपलचेसमध्ये भारताकडून खेळणारा महाराष्ट्राचा पुरुष गटातील पहिला अाणि अोव्हरअाॅल दुसरा धावपटू ठरला. अाता त्याने जागतिक स्पर्धेत या गटात १३ वे स्थान गाठले अाहे.

ललिताने रिअो अाॅलिम्पिक स्पर्धेत केले प्रतिनिधित्व
यापूर्वी अाॅलिम्पियन ललिता बाबरने हा पराक्रम गाजवला. तिने २०१६ मध्ये रिअो अाॅलिम्पिक स्पर्धेत स्टिपलचेसमध्ये सहभागी होऊन नववे स्थान गाठले होते. अाता अविनाश या गटात धावणार अाहे.

पुरुष वाॅक रेस गटात जपान संघाने जिंकली तिन्ही पदके
जपान संघाने पुरुषांच्या वाॅक रेस गटात क्लीन स्वीप दिले. या गटातील तिन्ही पदके जपानच्या धावपटूंनी जिंकले. यात तोशिकाजू यामानिशीने सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला.

X
COMMENT