Home | TV Guide | Avinash Sachdev About Ex Wife Shalmalee Desai

2 वर्षांपुर्वी ऑनस्क्रीन भाभीसोबत 'हातिम'च्या अॅक्टरने केले होते लग्न, घटस्फोट न घेताच वर्षभरापासून राहिला वेगळा, आता म्हणतो - खरं सांगायच तर माझ्याकडे आता तिचा नंबरही नाही 

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 28, 2019, 10:42 AM IST

एकेकाळी किन्नर बहूसोबत लग्न करणार होता अॅक्टर पण एका कारणांमुळे झाले ब्रेकअप 

  • Avinash Sachdev About Ex Wife Shalmalee Desai

    मुंबई. 'हातिम', 'कुबूल है', 'बालिका वधू' आणि 'छोटी बहू' सारख्या शोज केलेला टीव्ही अॅक्टर अविनाश सचदेव नुकताच आपल्या वयक्तिक आयुष्याविषयी बोलला. मुलाखतीत अविनाशने सांगितले की, आता त्याच्याजवळ त्याच्या बायकोचा नंबरही नाही. अविनाश म्हणाला "खरं तर आता माझ्याकडे तिचा नंबर नाही. काही कॉमन फ्रेंड्सने सांगितले की, ती तिच्या आयुष्यात आनंदी आहे. याव्यतिरिक्त मला काही आयडिया नाही. ते म्हणतात ना की, जर तुम्हाला योग्य मुलगी मिळाली तर आयुष्य सहज निघून जाते पण चुकीची मिळाली तर आयुष्य खराब होते. आता मी रिलेशनशिपसाठी रेडी नाही. कमीत कमी 2 वर्षे तरी नाही. माझ्या कुटूंबाला माझी काळजी आहे. पण मी त्यांना सांगून टाकले आहे." खरंतर अविनाश सचदेवने 2015 'इस प्यार को क्या नाम दूं' मालिकेतील को-अॅक्ट्रेस शाल्मली देसाईसोबत लग्न केले. शाल्मलीने या मालिकेत अविनाशच्या वहिणीची भूमिका साकारली होती. पण लग्नानंतरच अविनाश आणि शाल्मलीचे नाते बिघडू लागले. 2017 मध्ये शाल्मलीने अविनाशवर मारहाणीचा आरोप लावला आणि दोघं त्या वर्षापासून वेगळे झाले.

    एकेकाळी या अभिनेत्रीला डेट करायचा अविनाश
    - अविनाश सचदेव एकेकाळी 'किन्नर बहू'च्या भूमिकेत प्रसिध्द झालेली अभिनेत्री रुबीना दिलाइकला डेट करायचा. दोघांची पहिली भेट 'छोटी बहू'च्या सेटवर झाली होती. यानंतर आउटडोर शूटिंदरम्यान दोघांचे बोलणे सुरु झाले आणि हळुहळू मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले.


    - अविनाश सचदेव आणि रुबीना दिलाइकचे नाते लग्नापर्यंत पोहोचले होते. अविनाशने आपल्या आजोबांना लग्नाविषयी सांगितले. याच काळात वृत्त आले की, दोघांनी गुपचूप लग्न केले. पण नंतर अविनाश आणि रुबीनाने लग्नाचे वृत्त फेटाळून लावले. दोघं 4 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिले आणि नंतर 2013 मध्ये एका घडीला ते वेगळे झाले. रिपोर्टनुसार, अविनाशचे अफेअर दूस-या मुलीसोबत असल्यामुळे त्यांचे ब्रेकअप झाले.

Trending