आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा प्रेमात पडला \'छोटी बहू\' सिरियलचा अभिनेता, एका वर्षापूर्वीच झाला पत्नीपासून वेगळा आणि आता रिअॅलिटी शोच्या कन्टेस्टंटला करत आहे डेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : टीव्ही सीरियल 'छोटी बहू' फेम टीव्ही अभिनेता अविनाश सचदेव आपल्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आहे. चर्चा आहे की, अविनाश रिअॅलिटी शो स्प्लिट्सविला फेम पलक पुरस्वानीला डेट करत आहे. अविनाश आणि पलक यांचे सोबत वेळ घालवतानाचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अविनाशने पलकसोबत एक डिनर फोटो शेयर केला होता. ज्यावर टीव्ही अभिनेत्री दीपशिखा नागपालने रिलेशनशिप कंफर्मेशन कमेंट केले, "तुम्ही दोघे सोबत छान दिसता" सोर्सेअनुसार, अविनाश आणि पलक काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अविनाश बऱ्याचदा शूटिंगमध्ये व्यस्त असतो त्यामुळे कपलला लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप मेंटेन करावी लागते. 

 

एक्स वाइफसोबत अविनाशचे बोलणेही होत नाही... 
- टीव्ही अॅक्टर अविनाश सचदेव नुकताच आपल्या वयक्तिक आयुष्याविषयी बोलला. मुलाखतीत अविनाशने सांगितले की, आता त्याच्याजवळ त्याच्या बायकोचा नंबरही नाही. अविनाश म्हणाला, "खरं तर आता माझ्याकडे तिचा नंबर नाही. काही कॉमन फ्रेंड्सने सांगितले की, ती तिच्या आयुष्यात आनंदी आहे. याव्यतिरिक्त मला काही आयडिया नाही. ते म्हणतात ना की, जर तुम्हाला योग्य मुलगी मिळाली तर आयुष्य सहज निघून जाते पण चुकीची मिळाली तर आयुष्य खराब होते. आता मी रिलेशनशिपसाठी रेडी नाही. कमीत कमी 2 वर्षे तरी नाही. माझ्या कुटूंबाला माझी काळजी आहे. पण मी त्यांना सांगून टाकले आहे." 
- खरंतर अविनाश सचदेवने 2015 'इस प्यार को क्या नाम दूं' मालिकेतील को-अॅक्ट्रेस शाल्मली देसाईसोबत लग्न केले. शाल्मलीने या मालिकेत अविनाशच्या वहिणीची भूमिका साकारली होती. पण लग्नानंतरच अविनाश आणि शाल्मलीचे नाते बिघडू लागले. 2017 मध्ये शाल्मलीने अविनाशवर मारहाणीचा आरोप लावला आणि दोघं त्या वर्षापासून वेगळे झाले.

 

एकेकाळी या अभिनेत्रीला डेट करायचा अविनाश...  
- अविनाश सचदेव एकेकाळी 'किन्नर बहू'च्या भूमिकेत प्रसिध्द झालेली अभिनेत्री रुबीना दिलाइकला डेट करायचा. दोघांची पहिली भेट 'छोटी बहू'च्या सेटवर झाली होती. यानंतर आउटडोर शूटिंदरम्यान दोघांचे बोलणे सुरु झाले आणि हळुहळू मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले.
- अविनाश सचदेव आणि रुबीना दिलाइकचे नाते लग्नापर्यंत पोहोचले होते. अविनाशने आपल्या आजोबांना लग्नाविषयी सांगितले. याच काळात वृत्त आले की, दोघांनी गुपचूप लग्न केले. पण नंतर अविनाश आणि रुबीनाने लग्नाचे वृत्त फेटाळून लावले. दोघं 4 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिले आणि नंतर 2013 मध्ये एका घडीला ते वेगळे झाले. रिपोर्टनुसार, अविनाशचे अफेअर दूस-या मुलीसोबत असल्यामुळे त्यांचे ब्रेकअप झाले.

 

बातम्या आणखी आहेत...