आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली : पुढच्या वर्षी २०२० च्या टाेकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी हाेणारे भारतीय खेळाडू आता लवकरच पडद्यावर झळकणार आहेत. यात महाराष्ट्राच्या धावपटू अविनाश साबळेसह नेमबाज राही सरनाेबत आणि तेजस्विनी सावंतचा संघर्षमय प्रवास आता लघुपटाच्या माध्यमातून दिसणार आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेतील प्रवेश निश्चितीसाठीचा पल्ला गाठण्यासाठी या खेळाडूंनी केलेल्या मेहनतीवर आता लघुपट (शाॅर्टफिल्म) तयार करण्यात येणार अाहे. याच लघुपटाच्या माध्यमातून देशातील युवा खेळाडूंना क्रीडा विश्वात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठीची प्रेरणा मिळणार आहे. यासाठीचा निर्णय केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे हा नवा प्रयाेग युवांसाठी महत्वाचा ठरेल.
मेहनतीचे महत्त्व पटवणाऱ्या लघुपटाद्वारे युवा खेळाडूंना मिळेल प्रेरणा
१. खेळाडूंच्या नावे क्रीडा अकादमी, शासनाचे अनुदान :
क्रीडा मंत्रालय आता टाेेकियाे ऑलिम्पिक स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंच्या नावे अकादमी सुरू करणार आहे. यासाठी शासनाकडून अनुदान पुरवले जाईल. यासाठी वेगळ्या प्रकारचा निधीही उपलब्ध केला जाईल, असा निर्णय घेण्यात आला.
२. खेळासाठी दत्तक याेजना :
क्रीडा मंत्रालयाच्या वतीने अशा प्रकारच्या याेजनेला आता बिझनेस हाऊसचे माेलाचे पाठबळ लाभणार आहे. यासाठी या हाऊसच्या माध्यमातून प्रत्येक खेळाला दत्तक घेतले जाईल. यातून या खेळाला प्रमाेट केले जाणार आहे. यातून ऑलिम्पिकपूर्वी देशात खेळाची आवड निर्माण करणारी वातावरणनिर्मिती हाेणार आहे. यामुळे भारताच्या ऑलिम्पिकवीरांच्या मेहनतीवर प्रकाश पडणार आहे.
३. टाेकियाेतील प्रत्येक घरात राहणार भारताचे खेळाडू :
जपानमधील भारतीय नागरिक आता टाेकियाे ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळाडूंना आपल्या घरात ठेवणार आहेत. यातूनच या खेळाडूंना या स्पर्धेदरम्यान आपल्या कुटुंबीयांसारखेच वातावरण मिळणार आहे. तसेच त्यांना भारतीय पद्धतीचेच जेवणही मिळणार आहे, अशी व्यवस्था क्रीडा मंत्रालयाच्या वतीने करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या मदतीसाठी तयार असलेल्या भारतीय नागरिकांच्या शाेधाची जबाबदारी आता ऑलिम्पिक संघटनेवर दिली आहे.
४. दूरदर्शनवर दिसणार लघुपट : टाेकियाेतील ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता पूर्ण करण्यासाठी प्रत्येक खेळाडूला माेठी मेहनत घ्यावी लागली. त्यामुळेच त्यांना हा पल्ला गाठता आला. त्यांच्या याच मेहनतीवर लघुपट तयार केला जाईल. हा लघुपट दूरदर्शनवर दाखवला जाणार आहे. विविध वाहिन्यांशी याच्या प्रसारणाबाबत चर्चा केली जात आहे.
५. मूळ भारतीय खेळाडूंचा डेटा केला तयार : विविध देशांत राहणाऱ्या मूळ भारतीय खेळाडूंचा डेटा तयार केला जात आहे. प्रवासी दिनानिमित्त ग्लाेबल स्पर्धेचे आयाेजन केले जाणार आहे. विविध देशांतील मूळ भारतीय खेळाडूंना यात सहभागी केले जाईल.
६. स्पाेर्ट॰समध्ये करिअर करणाऱ्यांसाठी ऑनलाइन काेर्स :
स्पाेर्ट॰समध्ये करिअर करण्यास उत्सुक असलेल्या क्रीडाप्रेमींसाठी खास ऑनलाइन काेर्स सुरू हाेणार आहे. यासाठी मानव संसाधन मंत्रालयाची मदत लाभणार आहे.
७. जिल्हास्तरावरही खेळाची सुविधा : राष्ट्रीय स्तरावर डेटा डॅशबाेर्ड तयार केला जाईल. यामध्ये काेणत्या राज्यात, कुठल्या प्रकारच्या खेळाच्या सुविधा आहेत, याची परिपूर्ण माहिती असेल. याशिवाय राज्याच्या जिल्हास्तरीय खेळाडूंचीही माहिती असेल.
८. गुरू-शिष्यांसाठी पाेर्टल : खेळाडू व प्रशिक्षकांची माहिती देणारे ऑनलाइन पाेर्टलही सुरू करण्यात येणार आहे. यात दाेघांचीही माहिती दिलेली असेल.
क्रीडा मंत्र्यांच्या उपस्थिती झाले शिक्कामाेर्तब
यासाठी क्रीडा मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये टाेकियाे ऑलिम्पिक स्पर्धेतील सहभागी खेळाडूंच्या मेहनतीवर प्रकाशझाेत टाकणाऱ्या लघुपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय देशातील क्रीडा अकादमींना ऑलिम्पिकमधील पदकविजेत्या खेळाडूंचे नावही देण्यात येणार आहे. यावरही शिक्कामाेर्तब करण्यात आले. या बैठकीला क्रीडामंत्री किरेन रिजिजू, सचिव आर.एस. झुलानिया, साईचे डायरेक्टर संदीप प्रधान, टाॅप्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राजगाेपालन उपस्थित हाेते. लघुपटावरही चर्चा करण्यात आली. लघुपट देशभरात प्रसारित करण्याचा क्रीडा मंत्रालयाचा प्रयत्न आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.