आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उघड्यावरील पदार्थ खाण्याचे टा‌ळा, अन्यथा होऊ शकतात गंभीर आजार 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कडक उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरू झाला की ताजेतवाने वाटते. मात्र, हाच पावसाळा आपल्याबरोबर खूप सारे आजार घेऊन येतो. म्हणूनच जर आपल्याला चटर-पटर खाण्याची सवय असेल तरी पावसाळ्यात या गोष्टींपासून दूर राहणे चांगले. या काळात खाल्लेले नीट पचत नाही. बाजारातील फास्ट फूड खाल्ल्याने तर आजार पसरण्याची भीती वाढते. 


भजी : पावसाच्या सरी कोसळायला लागल्या की गरमागरम भजी आणि चहा आठवतो. तेलात तळलेली भजी पचवण्यासाठी कठीण असतात. यामुळे तुमचे पोट खराब होऊ शकते. म्हणून पावसाळ्यात बाजारातील भजी खाणे टाळा. 


चाट : या दिवसांत सर्वांना चटपटीत पदार्थ खायला आवडतात. प्रत्येक गल्लीच्या कोपऱ्याला लागणारे चाटचे ठेले आकर्षित करतात. मात्र, हे पदार्थ बनवण्यासाठी वापरले जाणारे पाणी, चटणी आणि बटाटे आपल्या तब्येतीवर वार करू शकतात. 


पाणीपुरी : या दिवसांमध्ये पाणीपुरी मुळीच खाऊ नये. यात वापरण्यात येणाऱ्यात पाण्यात भरपूर जिवाणू असतात. त्यामुळे आपल्याला उलट्या, अतिसार, पोटातील वेदना, भूक न लागणे आणि टायफॉइडसारखे आजार होऊ शकतात. 


चायनीज फूड : रस्त्याचा बाजूला लागणारे चायनीज फूडचे ठेले आपल्याला स्वस्त डिश सर्व्ह करत असले तरी ते नूडल्स किंवा राइस उकळवण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी घाण असते. यात घातले जाणारे तेल, अजिनोमोटो आणि सॉसेस आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. 


फळांचा रस : ज्यूस पिणे आरोग्यासाठी चांगले असले तरी या दिवसात फळे लवकर खराब होतात. म्हणून बाजारात ज्यूस पिणे टाळावे आणि आधीपासून कापून ठेवलेली फळेही खाऊ नयेत. कापून ठेवलेली उघड्यावरची फळे खाल्ल्याने जुलाब व संसर्ग होण्याची शक्यता असते. 

बातम्या आणखी आहेत...