आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वतंत्र चित्रपट निर्मितीसाठी सरकारी निधीपासून दूर राहावे : महनाझ मोहंमदी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी : ज्यांना स्वतंत्र चित्रपटांची निर्मिती करायची आहे त्यांनी सरकारी निधीपासून दूर राहावे, असे मत 'सन मदर' या इराणी चित्रपटाच्या दिग्दर्शिका महनाझ मोहंमदी यांनी व्यक्त केले. गोव्यातील पणजी येथे आयोजित ५० व्या इफ्फी महोत्सवात त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. या परिषदेत 'आय अॅम गोन्ना टेल गॉड एव्हरिथिंग' या चित्रपटाचे दिग्दर्शक डेव्ह पिन्न, 'द अदर हाफ' चित्रपटाचे निर्माते ॲल्यू डेनिए सुबोधी थेरो आणि 'द फोर्थ वॉल' चित्रपटाचे दिग्दर्शक झँग चाँग यांची उपस्थिती होती.

सिरियामध्ये २०११ ते २०१८ दरम्यान घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आपला चित्रपट असल्याचे डेव्ह पिन्न यांनी सांगितले. आगामी काळात अमेरिकेतील गन कल्चरवर चित्रपट करण्याचा आपला विचार असल्याचे ते म्हणाले. कला आणि चित्रपट यांचा उपयोग मानवी जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी आणि मानवी मूल्ये वृद्धिंगत करण्यासाठी होऊ शकतो, असे मत सुबोधी यांनी व्यक्त केले. भारतीय चित्रपट चीनमध्ये अत्यंत लोकप्रिय असल्याचे 'झँग चाँग' यांनी या वेळी सांगितले. भारतीय अभिनेते आमिर खान यांचे अनेक चाहते चीनमध्ये असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

'सन मदर' चित्रपटामध्ये इराणमधल्या लैला नावाच्या एका विधवेची कहाणी आहे.'आय एम गोन्ना टेल गॉड एव्हरिथिंग' चित्रपटात सिरियामध्ये २०११ ते २०१८ या कालावधीतील यादवीत घडलेल्या सत्य घटनांवर हा चित्रपट आहे. 'द अदर हाफ' चित्रपटामध्ये शिक्षण व्यवस्थेवरही या चित्रपटात भाष्य आहे.'द फोर्थ वॉल' चित्रपटात ली लू ही नायिका आणि मा है यांच्यातली एकतर्फी प्रेम कहाणी आहे. फँटसीच्या माध्यमातून दिग्दर्शकाने हा प्रवास उलगडला आहे.
 

बातम्या आणखी आहेत...