आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

35 पेक्षा कमी वयाचे असाल तर इनकम टॅक्स प्लॅनिंगवर करू नका या चुका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्ही दुसऱ्यांनी केलेल्या चुकांपासून धडे घेत असाल तर तुम्हालाही चुका करण्यापासून वाचावे लागेल. उदाहरणार्थ टॅक्स प्लॅनिंग करताना तुमच्या आई-वडिलांनी केलेल्या चुका टाळा. तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, ज्यांचे वय 35 पेक्षा कमी आहे असे लोक पैशासंबंधी सर्व व्यव्हार स्वत:च करतात. परंतू हे सर्व व्यव्हार करताना कोणत्या ठिकाणी किती पैसा जातो याकडे फार कोणी लक्ष देत नाही. जर या सर्व गोष्टींवर व्यवस्थित लक्ष दिल्यास पैशांची चांगली गुंतवणूक करता येते आणि भविष्यासाठी पैशांची सोय करुन ठेवता येते. आज आम्ही तुम्हाला टॅक्ससंबंधीत अशाच काही चुकांबद्दल सांगणार आहोत ज्या करण्यापासून तुम्ही वाचू शकतात. 

 

तुमच्या इनकमवर किती टॅक्स लागतो ते जाणून घ्या
तुमच्या सॅलरीवर टॅक्स न लागता तो तुमच्या एकूण इनकमवर लागतो. तुम्हाला सॅलरीव्यतिरिक्त अनेक स्त्रोतांकडून पैसे येत असतात. जसे की, फिक्स्ड डिपॉजिटवर मिळणारे व्याज, म्युचुअल फंडातून मिळणारे पैसे किंवा दुसरीकडून. अशात तुम्हाला एकूण लागणारा टॅक्स माहित करुन घेण्यासाठी सर्व इनकम एकत्र करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला कळू शकेल की किती टॅक्स भरावा लागतो. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या इनकमवर टॅक्स वाचवायचा असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक करू शकता.

 

टॅक्स वाचवायचा असेल तर गुंतवणूक करण्यासाठी घाईगडबड करू नका
तुम्हाला टॅक्स वाचवण्यासाठी तुमच्या बँक अधिकाऱ्यांकडून, मित्रांकडून, नातेवाईकांकडून अनेकप्रकारचे सल्ले मिळत असतील. परंतू या सल्ल्यांवर अंमलबजावणी करण्याआधी योग्यप्रकारची माहिती जाणून घ्या. त्याच्या फायद्या तोट्यांविषयी माहित करुन घ्या. जर तुम्हाला हे सर्व करुन देखील अडचण येत असेल तर एखाद्या फायनेंशियल एक्सपर्टचा सल्ला घ्या.

 

आई-वडील किंवा कंपनीच्या हेल्थ कवरवर निर्भर राहू नका
तुम्हाला स्वत:साठी हेल्थ इंश्युरेंस प्लॅन खरीदे करणे नेहमी चांगले असते. त्यामुळे तुम्ही मेडिकल इमरजेंसीमध्ये पैसे उभे करू शकाल. याशिवाय तुम्ही हेल्थ इंश्युरेंस प्लॅन खरेदी केल्यास 25,000 रुपयांपर्यंत प्रीमियम भरण्याच्या टॅक्सवर सूट मिळण्यासाठी क्लेम करू शकता. 

 

गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या किती मिळेल रिटर्न
तुम्ही टॅक्स वाचवण्यासाठी गुंतवणूक करत असाल तर त्याआधी जाणून घ्या की तुमच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न मिळणार आहे. त्याशिवाय तुम्ही सुनिश्चत करा की, केलेल्या गुंतवणूकीवर मिळणारा रिटर्न किती आहे.

 

घर खरेदी करण्यात करु नका घाई 
तुम्हाला ऐकून आनंद होईल की, होम लोन घेऊन तुम्ही घर खरेदी करण्यासह टॅक्सही वाचवू शकतात. परंतू यात तुम्ही धोका खावू शकतात. त्याआधी योग्यरित्या माहिती आणि नियम समजून घ्या. त्यानंतरच घर खरेदी करा आणि नियमितपणे इमआय भरा.

 

बातम्या आणखी आहेत...