Home | Business | Business Special | Avoid these 5 mistakes in investment

पैशाची गुंतवणूक करताना करू नका 'या' पाच चूका, 'या' चूका टाळणे आपल्यासाठी राहील फायदेशीर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 05:14 PM IST

सीए आणि टॅक्स एक्सपर्ट देतात या पाच चुकांपासून सावध राहण्याचा सल्ला

 • Avoid these 5 mistakes in investment

  नवी दिल्ली - आपल्याला जर गुंतवणुकीच्या बाबतीत बारीक-सारीक गोष्टी माहीत असतील तर आपण आपल्या सॅलरी मधून खजीना उभा करू शकता. गुंतवणूक ही फायद्याची गोष्ट आहे पण अनेकवेळी त्याबद्दल काही गोष्टी माहीत नसल्यामुळे आपण त्याचा पूर्णपण लाभ नाही घेऊ शकत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगत आहोत ज्या तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. या काही चुका आहेत, आपण जर या चुका टाळल्या तर आपण चांगल्या पद्धतीने गुंतवणूक करू शकाल आणि आपल्याला त्याचा चांगला परतावाही मिळेल.

  सीए आणि टॅक्स एक्सपर्ट हिमांशू कुमार यांच्या मते या पाज चुका करण्यापासून सावध राहत तुमचे आर्थिक लक्ष प्राप्त करायला हवे.  पहिली चूक - गुंतवणूकीस उशीरा सुरुवात करणे
  अनेक लोक उशीर गुंतवणूक करण्यास सुरूवात करतात. ते कमवायला सुरूवात करतात पण काही कालांतरावे किंवा कोणी दुसऱ्याने सांगितल्यावर गुंतवणूक करतात. काहीजण विचार करतात की, एका ठराविक वेळेपासून गुंतवणूक करायला हवी आणि हीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरते. तुमचे वय कितीही कमी असले, सॅलरी कमी असली तरी गुंतवणूकीस मात्र लवकरात लवकर सुरूवात करावी. आपल्या नोकरी लागल्याबरोबर तुम्ही गुंतवणूकीस सुरूवात करा. यामुळे तुमचा पोर्टफोलियो मोठा होण्याची संधी असते आणि एका निश्चित कालावीधीनंतर तुमचा पैसा चांगल्याप्रमाणात वाढतो.

  पुढे वाचा ... इतर चुकांविषयी

 • Avoid these 5 mistakes in investment

  दुसरी चूक - कमी कालावधीत जास्त परताव्याची आशा ठेवणे 

   

  साधारणतः प्रत्येक गुंतवणूकदाराची सवय असते की, गुंतवणूक करताच परताव्याची आशा ठेवतात. मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये पैसा गुंतवल्यावर सहा महिने किंवा एका वर्षाच्या आत परतावा शोधतात. गुंतवणूक विशेषज्ज्ञांच्या मते ही देखील एक चूक आहे. गुंतवणूदाराने थोडा धीर धरणे आवश्यक आहे. जितक्या जास्त वेळेसाठी गुंतवणूक केली तितकी ती फायदेशीर असते. जसे की आपण एलआयसीला किंवा इतर दीर्घकालीन गुंतवणूकीशी संलग्न करता. त्याचप्रमाणे Mutual Funds ला देखील वेळ द्या. बाजारात 6 महिने किंवा 1 वर्षात दुप्पट किंवा तिप्पट होत नाही. आपल्याला जर असे वाटत असेल की, एखाद्या गुंतवणूकीत वेळ दिल्यानंतरही त्यामधून तुमच्या इच्छेप्रमाणे परतावा नाही भेटली तर अशावेळी तुम्ही तुमचा पोर्टफोलियो बदलू शकता. ।

   
  तिसरी चूक - मेडिकल आणि टर्म इन्शुरंस यांची माहिती न ठेवणे


  बहुतेक लोकांना वाटते की इंशोरंस म्हणजे एलआयसी आणि इतर कोणते दीर्घकालीन हेल्थ इंशोरंस आहे. पण असे काही नसते. आजच्या काळात मेडिकल इंशोरंस अत्यंत आवश्यक आहे. आपल्या जर काही झाले तर तुमज्या परिवारासाठी टर्म इंशोरंस उपयोगी पडते. मेडिक्लेमच्या मदतीने तुम्ही आजार किंवा इतर मेडिकल खर्च करू शकाल. आपण मेडिक्लेम घेतले नसेल तर रूग्णालयाचे मोठ-मोठे बिलांचा तुमच्यावर भार पडेल. अशावेळेस अनेकवेळा काही लोक त्यांच्या गुंतवणूकीला परत घेतात. हे येणाऱ्या भविष्यात नुकसानकारक ठरू शकते. 
   
  पुढे वाचा -  इतर चुकांविषयी  

 • Avoid these 5 mistakes in investment

  चौथी चूक - न ठरवता गुंतवणूक करणे 

  अनेकदा लोक गुंतवणूकीच्या नावावर कोणत्याही Fixed deposit, म्युच्युअल फंड किंवा इतर ठिकाणी गुंतवणूक करतात. ते योग्य ती प्लॅनिंग करत नाहीत जसे की, त्यांचे दीर्घकालीन उद्देश काय आहे, त्यांना भविष्यात कोणत्या गोष्टीसाठी किती पैशाची आवश्यकता भासेल आणि त्या अनुषंगाने सर्वात चांगली गुंतवणुक कोठे करता येईल? त्यामुळे तुमची सॅलरी, तुमचे वय आणि आवश्यक हिशोबाने आपल्यासाठी चांगला गुंतवणुक प्लॅन निवडावा. सोबतच आपला सगळा पैशाची एकाच ठिकाणी गुंतवणूक करू नका. आपल्या भविष्यातील गरजेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करू शकता. यामुळे बाजारात मंदी जरी आली तरी तुमचा पैसा बुडणार नाही.   

   

  पाचवी चूक - आर्थिक सल्लागार न निवडणे किंवा त्यांचा सल्ला न ऐकणे
  बहुतांश लोकांना बाजार आणि गुंतवणूकीच्या लहान-सहान गोष्टी माहीत नसतात. असे असूनही दे आपला पोर्टफोलियो स्वतःच सांभाळण्याचा प्रयत्न करतात. अनेकवेळा हे धोकादायक होऊ शकते. तुम्हाला तुमच्या गुंतवणूकीसाठी एखाद्या एक्सपर्टकडून सल्ला घेणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्ही बाजाराची नस ओळखून योग्या ठिकाणी गुंतवणूक करू शकताल. आर्थिक सल्लागार निवडताना तुम्हालाही बाजारातील काही गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे. जेणेकरून तुमजा सल्लागार तुमचा फायदा घेणार नाही. 

Trending