आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खर्चिक विवाह टाळून 2 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - धुळे जिल्ह्यातील कल्पेश आणि प्रियंका देवरे या नवदांपत्याने लग्न साेहळ्याचा खर्च वाचवून नोंदणी पद्धतीने विवाह केला. वाचवलेल्या सुमारे २ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस दिला.  


बोरीस (ता. जि. धुळे) येथील शेतकरी परशुराम भाईदास देवरे यांचे सुपुत्र कल्पेश आणि उंभरे (ता. साक्री, जि. धुळे) येथील शेतकरी संजय काशीनाथ सोनवणे यांची कन्या प्रियंका यांचा विवाह नुकताच झाला. वर-वधू आणि दोन्ही बाजूंच्या कुटुंबीयांनी खर्चिक समारंभाचे आयोजन टाळण्यावर सहमती दर्शवली. साधेपणाने विवाह करून वाचवलेला पैसा, राज्यातील सध्याच्या दुष्काळ निवारण कार्यासाठी मदत म्हणून देण्याचा निश्चय करून नोंदणी पद्धतीने विवाह लावण्यात आला. 


देवरे, साेनवणे कुटुंबीयांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
कल्पेश आणि प्रियंकासह त्यांच्या आई-वडिलांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन २ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. माजी आमदार प्रा. शरद पाटील या कुटुंबीयांसमवेत उपस्थ‍ित होते. समाजासमोर घालून दिलेल्या या आदर्शाबद्दल मुख्यमंत्र्यांनी नवदांपत्याचे तसेच देवरे आणि सोनवणे कुटुंबीयांचे अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...