आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळच्या वेळी 'या' गोष्टी टाळल्यास राहाल निरोगी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सकाळ झाली की आपण उत्तम आरोग्यासाठी विविध प्रकारच्या गोष्टी करतो. कुणी फिरायला जातात, तर कुणी जिमला जातो. तर कुणी योगा करतात. पण केवळ काही गोष्टी केल्याचाच आपल्या आरोग्यावर परिणाम होत नाही, तर काही गोष्टी टाळल्याचाही आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. या गोष्टी जर आपण टाळल्या तर नक्कीच आपलं आरोग्य सुधृढ राहण्यासाठी मदत होते. तर चला जाणून घेऊया उत्तम आरोग्यासाठी कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात. 


उत्तम आरोग्यासाठी सकाळी टाळा पुढील गोष्टी... 
लोळत र
ाहणे : झोप झाल्यावरही आपण लोळत आहात तर हे आपल्या आरोग्यासाठी योग्य नाही. अशाने आळशीपणा वाढतो आणि स्फूर्ती मिळत नाही. 

धूम्रपान 
धूम्रपान करणे आरोग्यासाठी नुकसानदायकच आहे, तरीही सकाळी उठल्याबरोबर आपल्याला स्मोकिंग करण्याची सवय असेल तर ती अजून धोकादायक आहे. याने कर्करोग होण्याची शक्यता वाढते. 

तंबाकु, मावा खाणे 
अनेक लोक वॉशरूममध्ये जाण्याच्या आधी तंबाकू किंवा मावा, गुटखा खातात. या गोष्टीही आरोग्यास हानीकारक आहेत. त्यामुळे सकाळ असो किंवा दिवसा कधीही या गोष्टी टाळणे गरजेचे आहे. 

अल्कोहल 
सकाळी अल्कोहलचे सेवन केल्याने अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशाने वयात होणाऱ्या व्याधी आणि रोग आधीच शरीरात घर करू लागतात. 

वाद : सकाळी-सकाळी नको तो वाद. हे तर ऐकलं असेल. हे खरं आहे… सकाळी वाद केल्याने आपला मूड आणि दिवस दोन्ही खराब होतात. आपला मूड चांगला नसला तर त्याचा परिणाम आपल्यासोबत राहणाऱ्यावर पडेल आणि ताण येईल. म्हणून वाद टाळा. 

मसालेदार आहार 
सकाळचा आहार पौष्टिक आणि सात्त्विक असला पाहिजे. मसालेदार, चमचमीत आहाराने पोटात जळजळ होते आणि पचन‍ क्रिया बिघडते. मग दिवसभर अस्वस्थ वाटत असतं. 

बातम्या आणखी आहेत...