आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिल गेट्स फाउंडेशन तर्फे मोदींना 'ग्लोबल गोलकीपर' पुरस्कार प्रदान; स्वच्छ भारत अभियानाद्वारे केलेल्या कामगिरी बद्दल केला सन्मान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिल अॅण्ड मेलिंडा गेस्ट फाउंडेशन तर्फे प्रतिष्ठित 'ग्लोबल गोलकीपर पुरस्कार'ने सन्मानित करण्यात आले. लिंकन सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स येथे पार पडलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोदींनी स्वच्छ भारत अभियानाद्वारे स्वच्छता क्षेत्रात केलेल्या नेतृत्वासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. 'ग्लोबल गोलकीपर' विकास कामांच्या क्षेत्रात देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो.
 

   

यामुळे हा पुरस्कार माझ्यासाठी व्यक्तिगतरीत्या महत्वाचा  - मोद
स्वच्छ भारत अभियानामुळे भारतातील 50 कोटी लोकांना स्वच्छतेची सुरक्षा मिळाली असल्याचे फाउंडेशनने म्हटले. दरम्यान पंतप्रधान मोदींनी हा पुरस्कार दिल्याबद्दल बिल अॅण्ड मेलिंडा फाउंडेशनचे आभार मानले. मोदी म्हणाले की, 'हा माझा नाही तर स्वच्छ भारत संकल्पाला सिद्ध केलेल्या लोकांचा सन्मान आहे. महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्ताने मला हा पुरस्कार देण्यात येतोय हे माझ्यासाठी व्यक्तिगतरीत्या महत्वाचे आहे. एखादा संकल्प पूर्ण करण्यासाठी 130 कोटी लोकांची जनशक्ती एकत्रित आली तर कोणत्याही आव्हानावर विजय प्राप्त करता येतो. हा पुरस्कार त्याचाच पुरावा आहे.'
 

मोदींची जागतिक नेत्याच्या रुपातील प्रतिमा अधिक चांगली
सदरील पुरस्कार सततच्या विकासाच्या उद्दीष्टांमधील कामगिरीसाठी एका जागतिक नेत्याला देण्यात येतो. याअगोदर नॉर्वेचे पंतप्रधान एर्ना सोलबर्ग आणि लायबेरियाचे राष्ट्रपती सरलीफ यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.  ग्लोबल गोलकीपर अवॉर्ड, सोल शांती पुरस्कार आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण आदी पुरस्कारांमुळे मोदींची शांतता, विकास आणि गरिबांच्या उन्नतीसाठी काम करणारे जागतिक नेत्याच्या रुपात त्यांची प्रतिमा चांगील राहील असे जाणकारांचे म्हणणे आहे. 

बातम्या आणखी आहेत...