Awareness / पावसाळ्यात डासांपासून सावध रहा; बचाव करण्यासाठी या गोष्टी करा

रात्री झोपतेवेळी मच्छरदानीचा तसेच मॉस्किटो रेपलेंटचा उपयोग करा
 

दिव्य मराठी

Aug 01,2019 04:18:00 PM IST

हेल्थ डेस्क - पावसाळ्यात डासांमुळे मलेरिया, जीका आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या दोन्ही आजारांनी ग्रस्त असलेला व्यक्तीला शारिरीक कमचोरी होते. अशाप्रकारच्या आजारांचा उपचार झाल्यानंतर कमजोरीतून बाहेर पडण्यासाठी बराच वेळ लागतो. यामुळे डासांपासून स्वतःचा बचाव करणे आपल्यासाठी चांगले असते. यामुळे या डासांपासून होणाऱ्या आजारांना बळी पडू नका.


पाण्याची साठवू होऊ देऊ नका
साचलेल्या पाण्यात डासांची वाढ होते. यामुळे आपल्या आजुबाजुला कोठेही पाणी साठवू देऊ नका. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचते यामुळे डासांची वाढ होते. कूलर सारख्या गोष्टींची नेहमी स्वच्छता करा.


मॉस्किटो रेपलेंटचा वापर करा
घरात किंवा बाहेर सगळीकडे डासांचा उपद्रव असतो. यामुळे तुम्ही घरात असो किंवा बाहेर डासांपासून सावध राहणे महत्वाचे आहे. घरात जर लहान मुले असतील तर झोपतेवेळी मच्छरदानीचा वापर करा. सोबतच तुम्ही मॉस्किटो रेपलेंटचा वापर केल्याने डासांपासून बचाव होऊ शकतो.


पूर्ण कपडे परिधान करा
पावसाळ्यात ओलाव्यामुळे डासांची संख्येत वाढ होते. शरीर उघडे असल्यावर डास चावतात. यामुळे आजारी पडण्याचा धोका संभवतो. यामुळे आजारापांसून वाचण्यासाठी पूर्ण बाह्याचा शर्ट आणि फुल लेंथ पँट्स परिधान करा.

नोट - जीका व्हायरस ग्रस्त असलेल्या भागातून प्रवास करणे टाळावे. तसेच जीका संक्रमित व्यक्तिपासून दूर रहावे. आजाराबाबात कोणतेही लक्षण दिसले तर त्याकडे दुर्लक्ष न करता रुग्णालयात जावे. दुर्लक्ष केल्यामुळे रुग्णाची प्रकृती बिघडू शकते. हे त्याच्यासाठी जीवघेणे ठरू शकते.

X