आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहानंतर ईशा अंबानी आणि आनंद पिरामल राहणार 452 कोटींच्या बंगल्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लग्नानंतर ईशा अंबानीचा पत्ता अँटिलियाऐवजी वरळी असणार आहे. आनंद पिरामलशी १२ डिसेंबरला लग्न झाल्यानंतर ईशा अंबानी अँटिलियाचे माहेर सोडून वरळीस्थित सासरचा बंगला ओल्ड गुलिटामध्ये राहील. वरळी येथील या पाच मजली घरातून सागराचे दृश्य दिसते. बंगला ५० हजार फूट चौ. फुटांत विस्तारला आहे. आनंद यांचे वडील अजय पिरामल यांनी २०१२ मध्ये हिंदुस्तान युनिलिव्हरकडून तो खरेदी केला होता.  


हा बंगला खरेदी करण्याच्या शर्यतीत अनिल अंबानी व गौतम अदानीही होते, असे सांगितले जाते. अनिल अंबानी यांनी ३५० कोटी रुपये, तर गौतम अदानी यांनी ४०० कोटी रुपयांची बोली लावली होती. मात्र, अजय पिरामल यांनी ४५२.५ कोटींची बोली लावून तो खरेदी केला होता. या बंगल्यात तीन बेसमेंट आहेत. त्यात दोन सर्व्हिस व पार्किंगसाठी आहेत. पहिल्या बेसमेंटमध्ये लॉन, वॉटर पूल व एक बहुउद्देशीय खोली अाहे. तळमजल्यावर एंट्रन्स लॉबी व त्यावरील मजल्यात लिव्हिंग, डायनिंग हॉल,  विविध खोल्या व बेडरूम आहे.

 

आनंद यांचे आई-वडील अजय व स्वाती पिरामल यांनी हा बंगला मुलगा व होणाऱ्या सुनेला भेट म्हणून दिला आहे. या घराचे बांधकाम २०१५ मध्ये सुरू झाले होते. मालमत्तेला सर्व प्रकारच्या परवानग्या, प्रमाणपत्र सप्टेंबरमध्ये मिळाले होते. घराचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आता अंतर्गत सजावटीचे काम बाकी आहे. हे कामही १ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे मानले जाते. यानंतर घरात पूजा विधी होईल.  


ईशा हिचे वडील मुकेश अंबानींचा बंगला अँटिलिया ४ लाख चौ. फुटांत आहे. २७ मजल्यांच्या या बंगल्यात मुकेश अंबानींचे कुटुंब राहते. बंगल्याच्या देखभालीसाठी ६०० कर्मचाऱ्यांचा स्टाफ अाहे. लंडनच्या बर्मिंगघम पॅलेसनंतर अँटिलिया जगातील दुसरी सर्वात महागडी मालमत्ता आहे. बाजारभावाप्रमाणे याची 

 

लग्नपत्रिकाही सृजनात्मक, एक पत्रिका तयार करण्यासाठी ३ लाख रुपये खर्च आला  

ईशाची लग्नपत्रिका काही दिवसांपासून चर्चेत आहे. एका पेटीच्या आत डायरीसारखी पत्रिका तयार केली आहे. डायरीच्या चौथ्या पानावर ईशा व आनंदने लिहिलेले संदेश आहेत. पेटीवर ईशा व आनंद यांच्या नावाचे पहिले अक्षर लिहिले आहे. यामध्ये सोनेरी नक्षीकामाचा आणखी एक बॉक्स आहे. तो उघडल्यावर गायत्री मंत्राची धून वाजते. त्याच्या आत चार लहान बॉक्स असून त्यात वेेगवेगळ्या भेटवस्तू आहेत. राजेशाही थाटात तयार केलेल्या या पत्रिकेवर सुमारे ३ लाख रु. खर्च आला अाहे.  काही दिवसांपूर्वी अंबानी कुटुंबाने सांगितले होते की, लग्नविधी अंबानी कुटुंबाच्या घरीच पार पडतील. मुलीच्या विवाहाची माहिती देण्याआधी अंबानी कुटुंब सिद्धिविनायक मंदिरात पत्रिका घेऊन गेले होते.

 

बातम्या आणखी आहेत...