Home | Off Screen | Ayesha Khurana accused of 'Baala' on cheating case, Assistant Director complained

आयुष्मान खुरानासह 'बाला' च्या मेकर्सवर फसवणुकी प्रकरणी गुन्हा दाखल, असिस्टंट डायरेक्टरने केली तक्रार 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Jun 02, 2019, 03:27 PM IST

10 जूनपूर्वी काही बोलणार नाही आयुष्मानची टीम

 • Ayesha Khurana accused of 'Baala' on cheating case, Assistant Director complained

  बॉलिवूड डेस्क : सध्या कानपुरमध्ये शूट होत असलेली आयुष्मान खुरानाचा आगामी चित्रपट 'बाला'च्या मेकर्सवर कथा चोरल्याचा आरोप केला गेला होता. आता या प्रकरणी मेकर्ससह आयुष्मानचेही प्रॉब्लेम्स वाढताना दिसत आहेत. चित्रपट 'विग'चे रायटर कमल चंद्राने काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर आयपीसी आणि आयपीआर कलमांन्वये चीटिंग आणि क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट मोडल्याची कम्प्लेंट फाइल केली आहे. याप्रकरणी त्यांच्यावर जर आरोप सिद्ध झाला तर फ्रॉड केस आणि सेक्शन 420 नुसार त्यांना शिक्षा होऊ शकते. आधीच मागच्या काही महिन्यांपासून याप्रकरणी मुंबई हाय कोर्टात केस चालू आहे. कमल चंद्राने कोर्टाकडे मागणी केली आहे की, 'बाला'चे शूटिंग विलंब न करता थांबवले जावे. कोर्टात आता 10 जूनला पुढील सुनावणी होणार आहे.

  10 जूनपूर्वी काही बोलणार नाही आयुष्मानची टीम...
  दुसरीकडे आयुष्मान आणि बालाचे निर्माते शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. या नव्या घटनाक्रमावर आयुष्मानच्या लीगल टीमचे म्हणणे आहे की, हे प्रकरण कोर्टात सुरू आहे, सुनवाणी पुढच्या १० तारखेला आहे. त्यामुळे आम्ही काहीच टिप्पणी करणार नाही. आमच्याकडे मूळ पटकथा आहे. वेळ आल्यावर आम्ही ती कोर्टात दाखवू.

  कमल म्हणतात.. आम्हाला भारताच्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आता आम्ही या प्रकरणात पेालिसांची मदत घेऊ. त्याचबरोबर लवकरच एक प्रेस कॉन्फरन्सदेखील घेणार आहोत, ज्यामध्ये आम्ही मीडियासमोर निर्मात्यांना उघड करू. आम्ही जवळजवळ सर्व पुरावे दाखवू.

 • Ayesha Khurana accused of 'Baala' on cheating case, Assistant Director complained
 • Ayesha Khurana accused of 'Baala' on cheating case, Assistant Director complained

Trending