आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामलल्लाचे दर्शन घेणाऱ्या भाविकांमध्ये २०% वाढ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्या - अयोध्येतील कारसेवकपुरमजवळील कार्यशाळा. येथे येणारे बहुतांश लोक येथे लावण्यात आलेले शिलालेख वाचत भगवान रामाचे मंदिर किती भव्य असेल याची माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. येथे काय काय असेल याबद्दल प्रस्तावित मंदिराची रचना बघून लोक चर्चा करतात. दगडासमोर उभे राहून छायाचित्र काढतात. व्हीएचपीचे संघटनमंत्री त्रिलोकीनाथ पांडे सांगतात की, आणखी दगड भरतपूरच्या खाणीतून येणार आहेत. इशारा मिळताच कोरीव कामाला सुरुवात होईल.
न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर आता मंदिराचे दगड, खांबाचे दगड, खांब यांचे कोरीव काम पुन्हा सुरू करण्याची तयारी होत आहे. अयोध्या वादावर निकालास आठवडा पूर्ण झाला. यादरम्यान कार्यशाळेत येणारे लोक व रामलल्लाच्या दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. भास्करशी बोलताना विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते शरद शर्मा यांनी सांगितले की, बघणाऱ्यांची संख्या १६० टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. निकाल येण्याआधी येथे रोज सुमारे १५०० लोक येत होते. निकालानंतर आता ४००० लोक रोज येताहेत.