आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ayodhya Case Ram Mandir: Ayodhya Mediation Panel Submitted Report To Supreme Court: Sunni Waqf Board, Nirmohi Akhara

मध्यस्थता पॅनलकडून कोर्टात रिपोर्ट दाखल; सुन्नी वक्फ बोर्ड, हिंदू वादग्रस्त जमीनीवरून दावा सोडण्याची शक्यता!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाकडून नियुक्त करण्यात आलेल्या मध्यस्थता पॅनलने बुधवारी आपला समझोता अहवाल कोर्टात सादर केला. त्यानुसार, मुस्लिम आणि हिंदू पक्ष वादग्रस्त जमीनीवर समझोता करण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, रिपोर्टमध्ये हे देखील सांगण्यात आले की वादग्रस्त जमीनीवर मंदिर उभारण्यास सर्व पक्षांचे एकमत आहे. परंतु, त्यासाठी मशीदीला देखील जागा द्यावी लागेल. 134 वर्षे जुन्या अयोध्या प्रकरणात सुन्नी वक्फ बोर्ड 58 वर्षांपासून दावेदार आहेत. ऑल इंडिया बाबरी मशीदचे संयोजक जफरयाब जिलानी यांनी सुन्नी वक्फ बोर्डाच्या वादग्रस्त जमीन सोडण्याच्या तयारीवर प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबतची माहिती नसल्याचे सांगितले.


सुत्रांच्या माहितीनुसार, सुन्नी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जफर अहमद फारुकी यांच्याकडून श्रीराम पाँचूच्या माध्यमातून सेटलमेंट अर्ज दाखल करण्यात आले आहे. बोर्डाने अयोध्या वादामध्ये आपला दावा परत घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दोन दिवसांपूर्वीच पांचूने सुप्रीम कोर्टाकडे बोर्डास अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी केली होती. परंतु, त्याचे कारण सांगितले नव्हते. बोर्ड वादग्रस्त जमीनीच्या बदल्यात एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जमीन घेण्याच्या अटीवर सहमत आहे. सोबतच, बोर्डाने देशातील सर्वच धार्मिक स्थळांवर 1947 पूर्वीची परिस्थिती कायम ठेवण्याची मागणी केली आहे. त्यासाठी विशेष कायदा लागू करण्याचीही मागणी केली. हा कायदा दिवंगत माजी पंतप्रधान नरसिम्हा राव यांच्या सरकारने 1991 मध्ये मंजूर केला होता.