आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ayodhya Dispute| Do You Say That The Court Is Entitled To The Temple Property? Nirmohi Akha Yes

अयोध्येवर सुप्रीम सुनावणी 12 वा दिवस : कोर्टाचा प्रश्न-मंदिरातील मिळकतीवर हक्क आहे, असे आपले म्हणणे आहे? निर्मोही आखाडा- हो

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अयोध्येतील राम जन्मभूमीप्रकरणी साेमवारीे १२ व्या दिवशी निर्मोही आखाड्याने सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडली. आखाड्याने वादग्रस्त जमिनीवरील मंदिर आणि तेथील मूर्तींचे व्यवस्थापक असल्याचा वारंवार दावा केला तेव्हा सुप्रीम कोर्टाने त्यांना विचारले की, मंदिरात होणाऱ्या मिळकतीचे आपणही हक्कदार आहात, असे तुम्हाला म्हणायचे आहे का? यावर निर्मोही आखाड्याने म्हटले की, हो, मी हेच म्हणू इच्छितो. दुपारी ४ वा. सुनावणी मंगळवार सकाळपर्यंत स्थगित केली. सकाळी साडेदहा वा. अयोध्याप्रकरणी निर्मोही आखाड्याकडून वरिष्ठ वकील सुशील कुमार जैन यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर युक्तिवाद सुरू केला. 

काेर्ट लाइव्ह :
जैन यांनी बचाव पक्षाचे साक्षीदार राजा राम पांडेय यांचे जबाब वाचण्यास कुरुवात केली. पांडेय वादग्रस्त जागेजवळ राहत होते. साक्षीदार म्हणाले, त्यांनी रामलल्लाला वादग्रस्त जमिनीवरील वास्तूच्या गाभाऱ्यात लाकडी सिंहासनावर विराजमान असलेले पाहिले होते.

> {न्या. बोबडे- तुमचे म्हणणे काय आहे? 
जैन- माझ्या म्हणण्याचा आशय माझ्या व्यवस्थापनाच्या अधिकाराशी संबंधित आहे. कुठल्याही हिंदू पक्षकाराने या अधिकारावर शंका घेतली नाही. 
> न्या. बोबडे- तुम्ही म्हणाला होता की मालकी हक्क नको आहे. जर नको आहे तर पूजा करण्यापासून तुम्हाला कोणी रोखत नाहीये. तुम्हाला नेमके काय हवे आहे? 
> जैन- मला व्यवस्थापन हवे आहे. मी पूजा करू इच्छितो. पूजा माझ्याद्वारेच व्हावी.
> न्या. बोबडे- तुम्ही इतरांना पूजा करण्यापासून वंचित करू इच्छिता का?
> जैन- नाही, व्यवस्थापकाची कर्तव्ये असतात.
 
 

बातम्या आणखी आहेत...