आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयोध्याप्रकरणी आता जानेवारीत सुनावणी: आमचाही काही प्राधान्यक्रम : सुप्रीम कोर्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणाची सुनावणी पुढील वर्षातील जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ‘योग्य खंडपीठा’समोर ठेवण्याचा निर्णय सोमवारी घेतला. हे खंडपीठच सुनावणीचे वेळापत्रक निश्चित करेल.  
अयोध्येतील जमीन वाद प्रकरणाशी संबंधित खटल्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे. त्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश रंजन गोगोईंच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. उत्तर प्रदेश सरकार आणि रामलला यांची बाजू अनुक्रमे महाधिवक्ता तुषार मेहता आणि ज्येष्ठ विधिज्ञ सी. एस. वैद्यनाथन यांनी मांडताना त्वरित सुनावणीची विनंती केली होती. 

 

निर्णयानंतरच्या प्रतिक्रिया

हिंदूंचा संयम आता सुटत चाललाय : गिरिराज सिंह  
राम मंदिराच्या मुद्द्यावर हिंदूंचा संयम सुटत चालला आहे, संयम सुटला तर काय घडेल याचीच भीती मला वाटते, अशी टिप्पणी केंद्रीय राज्यमंत्री गिरिराज सिंह यांनी केली.

 

अध्यादेश आणूनच दाखवा; ओवेसींचे केंद्राला आव्हान 
हैदराबाद केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने राम मंदिरासाठी अध्यादेश आणूनच दाखवावा, असे आव्हान एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी दिले. 

 

बातम्या आणखी आहेत...