आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ayodhya Dispute: The Possibility Of Hearing In The Court Today On The Challenge Petition

अयोध्या वाद : आव्हान याचिकेवर आज कोर्टात सुनावणीची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१० मध्ये अयोध्येतील रामजन्मभूमीबाबत दिलेल्या निकालाविरोधात दाखल आव्हान याचिकांवर सर्वाेच्च न्यायालय सोमवारी सुनावणी करण्याची शक्यता आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने वादग्रस्त जागेच्या त्रिभाजनाचा निकाल दिला होता.  सरन्यायाधीश रंजन गोगोई ,न्या. संजय किशन कौल व न्या. के.एम. जोसेफ यांचे न्यायपीठ याचिकांची सुनावणी करणार आहे.  


न्यायालयाने १९९४ च्या निकालात मशीद ही इस्लामचा अविभाज्य भाग नसल्याचे निरीक्षण नोंदवले होते. याचा फेरविचार करण्याची मागणी करणारी याचिका पाच सदस्यीय घटना पीठाकडे वर्ग करण्यास सर्वाेच्च न्यायालयाने २७ सप्टेंबर रोजी नकार दिला होता.

बातम्या आणखी आहेत...