• Home
  • National
  • Delhi
  • Ayodhya dispute : The Supreme Court asked the Intermediary Committee to file a report till July 25

अयोध्या वाद / अयोध्या वाद : सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थी कमिटीकडे 25 जुलैपर्यंत मागितला अहवाल , म्हणाले - यानंतर दररोजच्या सुनावणीबाबत विचार करण्यात येईल

एका पक्षकाराने मंगळवारी याचिका दाखल करून लवकरात लवकर सुनावणीची मागणी केली होती
 

दिव्य मराठी वेब

Jul 11,2019 12:15:51 PM IST

नवी दिल्ली - अयोध्या वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थी कमिटीकडे 25 जुलैपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणात पक्षकार गोपाल सिंह विशारद यांनी लवकरात लवकर सुनावणी करण्याची याचिका न्यायालयाकडे दाखल केली आहे. यावर गुरुवारी सुनावणीदरम्यान मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने सांगितले की, मध्यस्थी समितीकडे कोणताही उपाय नसल्यास आम्ही या प्रकरणाची दैनिक सुनावणीचा विचार करण्यात येईल.


याचिकाकर्ताने मंगळवीर सांगितले होते की, पहिल्या चरणात मध्यस्थी कमिटीकडून विशेष काही प्रगती झाली नाही. यानंतर निर्मोही अखाडा लवकर सुनावणी बाबतच्या याचिकेचे समर्थन करत म्हणाले, की मध्यस्थी कमिटीची प्रक्रियी योग्य दिशेने होत नाही.

कोर्ट म्हणाले - कमिटीच्या अहवालाची प्रतिक्षा करू
याचिकाकर्ताचे वकील के. पारासरन म्हणाले, की मध्यस्थी कमिटीला कोणतेही सकारात्मक परिणाम मिळाले नाही. जर काही तडतोड होत असेल तर त्यासाठी न्यायालयाची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. अशाच कोर्टाने लवकरच सुनावणीची तारीख निश्चित करायला हवी. यादरम्यान मुस्लिम पक्षाचे वकील राजीव धवन म्हणाले की, ही मध्यस्थी कमिटीच्या प्रक्रियेवर टीका करण्याची वेळ नसून लवकर सुनावणीची मागणी करणारी रद्द करण्यात यावी. यावर त्यासाठी आम्ही कमिटी स्थापन केली असून कोर्ट त्याच्या अहवालाची वाट पाहीन असे कोर्टाने सांगतिले.

X
COMMENT