आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ayodhya Is Sacred To Hindus, Just As Mecca Is To The Muslim Community; Ramallah Virajman's Lawyer Argued

अयोध्या वाद : मुस्लिम समाजासाठी जसे मक्का, तशी हिंदूंसाठी अयोध्या पवित्र; रामलल्ला विराजमानच्या वकिलांचा युक्तिवाद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अयोध्या वादावर मंगळवारी सुप्रीम कोर्टात सलग पाचव्या दिवशी सुनावणी झाली. या वेळी पाचसदस्यीय घटनापीठाने रामलल्ला विराजमानच्या वकिलांना वादग्रस्त जागी श्रीरामांचे नेमके जन्मस्थळ कोणते, असा प्रश्न केला. यावर वकिलांनी सांगितले की, अलाहाबाद हायकोर्टाने जुन्या पाडण्यात आलेल्या मशिदीच्या घुमटाखालीच जन्मस्थान असल्याचे मान्य केले होते. मुस्लिम समाजासाठी मक्का-मदिनेचे जेवढे महत्त्व आहे, तसेच हिंदूंसाठी अयोध्या आहे, असेही वकिलांनी स्पष्ट केले. 

सुनावणीदरम्यान मुस्लिम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी रामलल्ला विराजमानच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादास विरोध केला. हे लोक केवळ हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने दिलेले निकालच दाखवत आहेत. एकही पुरावा त्यांनी दिलेला नाही. दरम्यान, यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी धवन यांना फटकारले. तुमच्या युक्तिवादात हे मुद्दे मांडा, असे सुनावले. कोणत्याही परिस्थितीत घाईघाईत ही सुनावणी केली जाणार नाही. सर्वांना पुरेसा वेळ दिला जाईल, असेही न्या. गोगोई म्हणाले. सुनावणी बुधवारीही सुरू राहील.