आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविजय उपाध्याय
अयोध्या/लखनऊ - अयोध्येजवळील बाजार ब्लाॅक व परिसरातील १०५ गावांतील सूर्यवंशी क्षत्रिय कुटुंबे ५०० वर्षांनंतर पुन्हा एकदा मस्तकी पगडी धारण करतील, चामड्याचे जोडे घालतील. राममंदिर नििर्मतीचा त्यांचा संकल्प पूर्ततेकडे आहे. गावांतील घराघरांत जाऊन आणि सार्वजनिक सभांत क्षत्रियांना पगड्यांचे वाटप केले जात आहे. सूर्यवंशी समाजाच्या पूर्वजांनी मंदिरावरील हल्ल्यानंतर जोवर ते पुन्हा उभारले जात नाही तोवर मस्तकी पगडी-डोक्यावर छत्री धरणार नाही आणि चामड्याचे जोडे घालणार नाही, अशी प्रतिज्ञा घेतली होती. सूर्यवंशी क्षत्रिय अयोध्येसह शेजारच्या बस्ती जिल्ह्यातील १०५ गावांत राहतात. हा सर्व ठाकूर परिवार स्वत:ला भगवान रामाचे वंशज मानतो.
कोर्टाच्या राममंदिर निर्मितीच्या आदेशानंतर या गावांत प्रचंड जल्लोष आहे. सरायरासीचे वकील बासदेव सिंह म्हणाले, येथे आतापर्यंत ४०० पगड्या वाटल्या आहेत. समाजाचे सुमारे दीड लाख बांधव येथील गावांत राहतात. प्रत्येक सदस्याला पगडी व फेटा देणे सुरू आहे. पूर्वजांची संकल्पपूर्ती झाली आहे. इतकी वर्षे आम्ही लग्नातही पगडी घातली नाही. अयोध्येच्या भारती कथा मंदिराच्या महंत ओमश्री भारती म्हणाल्या, ‘सूर्यवंशींच्या संकल्पामुळे आम्ही लग्नकार्यांत वेगळ्या पद्धतीने पगडी बांधायचो, जेणेकरून कपाळ उघडे राहील. पूर्वजांनी चपला-जोडे न घालण्याचा संकल्प केला होता तेव्हा पादत्राणे चामड्याची असत. म्हणून खडावा घातल्या जात असत. आता चामडे नसलेले जोडे-चपला बाजारात आल्याने ते घालू लागलो. मात्र समाजाने चामड्याचे जोडे कधीही घातले नाहीत.
जन्मभूमि उद्धार होय ता दिन बड़ी भाग, छाता पग पनही नहीं और न बांधहिं पाग
अलाहाबाद हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती डी.पी. सिंहनुसार त्यांचे पूर्वज १६ व्या शतकात मंदिराच्या रक्षणासाठी ठाकूर गजसिंहांच्या नेतृत्वात मोगलांशी युद्ध लढले. त्यात ते हरले. त्यानंतर गजसिंहांनी पगडी व जोडे न घालण्याची प्रतिज्ञा केली होती. कवी जयराजने लिहिले आहे- ‘जन्मभूमि उद्धार होय ता दिन बड़ी भाग। छाता पग पनही नहीं और न बांधहिं पाग।’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.