आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बाबरी’तील पक्षकार अन्सारींनी दिली अयोध्या साेडण्याची धमकी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्या - ४ व २५ नाेव्हेंबर राेजी शिवसेना व विश्व हिंदू परिषदेसह अनेक हिंदुत्त्ववादी संघटनांनी अयाेध्येत अायाेजित केलेल्या धर्मसभा व कार्यक्रमांच्या धास्तीने बाबरी मशिद खटल्याचे पक्षकार माेहंमद इक्बाल यांनी अयाेध्येतून बाहेर पडण्याचा इशारा दिला अाहे. अयाेध्येत राममंदिर उभारण्यासाठी शिवसेनेसह विहिंप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अाग्रही झाले असून त्यादृष्टीने कार्यकर्ते थेट अयाेध्येत धडक देणार अाहेत.

 

तिथेच उद्धव ठाकरेंची सभाही हाेणार अाहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हिंदुत्त्ववादी संघटनांसह संतांच्या गाेटात मंदिर उभारणीसाठीच्या हालचालींना वेग अाला अाहे. २४ नाेव्हेंबर राेजी माेठ्या संख्येने अनेक हिंदुत्त्ववादी लाेक अयाेध्येत पाेहाेचणार अाहेत. 

 

अन्सारी म्हणाले, ‘२४ व २५ नाेव्हेंबरला दाेन्ही कार्यक्रमात माेठ्या संख्येने लाेक येणार अाहेत. डिसेंबर १९९२ मध्ये अशीच गर्दी जमवून बाबरी मशीद व अयाेध्येतील अनेक प्रार्थनास्थळे उद‌्ध्वस्त करण्यात अाली हाेती. लाेकांची घरेेही जाळली हाेती. त्यामुळे या वेळी स्थानिक मुस्लिमांना सुरक्षा न मिळाल्यास शहर साेडण्याशिवाय पर्याय नसेल.’

 

आंदोलनासाठी २५ हजार बजरंगींची हाेणार भरती  
मंदिर अांदाेलन अाक्रमक व प्रभावी बनविण्यासाठी व २५ नाेव्हेंबरची प्रस्तावित धर्मसभा यशस्वी करण्यासाठी विहिंप  उत्तर प्रदेशात २५ हजार बजरंग दल कार्यकर्त्यांची नव्याने भरती करत अाहे. विहिंपचे प्रांत संघटनमंत्री भालेंद्र यांनी सांगितले, ‘भविष्यातील कार्यासाठी व्यापक तयारी सुरू अाहे. अवध, कानपूर, गाेरक्ष व काशीप्रांतात कारसेवकांच्या बैठका सुरू अाहेत. संघाच्या नेत्यांशी समन्वयानेपुढील रुपरेषा ठरविली जात अाहे.’

 

अयाेध्येतील धर्मसभा एेतिहासिकच, एक लाख रामभक्त येतील : विहिंप

राम मंदिर उभारणीसाठी २५ नाेव्हेंबर राेजी अयाेध्येत हाेणारी धर्मसभा एेतिहासिक हाेईल. यात एक लाख हिंदू सहभागी हाेणार अाहेत, असा दावा विश्व हिंदू परिषदेचे अांतराष्ट्रीय उपाध्यक्ष चंपत राॅय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, ‘सर्वाेच्च न्यायालयात राम मंदिराचा निर्णय हाेण्यास वेळ लागत अाहे. त्यामुळे सरकारनेच याबाबत कायदा करण्याची गरज अाहे. या देशातील हिंदू ५०० वर्षांपासून केवळ एका मंदिराच्या उभारणीसाठी लढत अाहेे. १२५ काेटी हिंदूंशी संबंधित या विषयाला सर्वाेच्च न्यायालयही प्राधान्य देत नाही हे खेदजनक अाहे,’ असे सांगतानाच राॅय यांनी मंदिर उभारणीत झालेल्या अक्षम्य उशिरास तत्कालिन काॅंग्रेस सरकारला जबाबदार धरले अाहे.

बातम्या आणखी आहेत...