आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ayodhya : The Central Government May Approve The Ram Temple Trust Today, 87 Days After The Court's Decision, The Outline Is Ready

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राममंदिर ट्रस्ट स्थापन; अयोध्येचे राजे, हिंदू पक्षाचे वकील परासरन विश्वस्त

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या ३ दिवसांआधी पाऊल
  • अयोध्येतील राममंदिराबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार ट्रस्टकडेच
  • गृहमंत्री शहा म्हणाले, विश्वस्तांत दलित समुदायातील एका व्यक्तीचा समावेश

नवी दिल्ली/अयोध्या - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राममंदिरासाठी ट्रस्ट स्थापनेची घोषणा बुधवारी केली. केंद्रीय मंत्रिमंडळाने ट्रस्ट स्थापनेस मंजुरी दिल्यानंतर मोदींनी लाेकसभेत याची माहिती दिली. ट्रस्टचे नाव ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ असे असून दिल्लीच्या ग्रेटर कैलाशमध्ये कार्यालय असेल. ट्रस्टच अयोध्येत राममंदिराची उभारणी व संबंधित निर्णय घेईल. विशेष म्हणजे, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानास ३ दिवस उरले असताना ही घोषणा झाली. ट्रस्टच्या विश्वस्तांत अयोध्या वादात हिंदू पक्षाचे मुख्य वकील राहिलेले ९२ वर्षीय के. परासरन, एका शंकराचार्यांसह ५ सदस्य धर्मगुरू आहेत. ट्रस्टमधील एक विश्वस्त दलित समुदायातील

पंतप्रधान मोदींनी अयोध्येत केंद्राने संपादित केलेली ६७ एकर जमीनही ट्रस्टला देणार असल्याचे सांगितले. या घोषणेच्या तासाभरातच गृहमंत्री अमित शहांनी ट्विट करून ट्रस्टचे नाव व विश्वस्तांची नावे जाहीर केली. ट्रस्टमध्ये एकूण १५ सदस्यांपैकी एक दलित समुदायातील असतील.वादग्रस्त २.५ एकरसह संपूर्ण जमीन रामलल्लाची

ट्रस्टला मंदिराबाबतचे निर्णय घेण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असेल. ६७.७०३ एकर जमीनही ट्रस्टला सोपवली जाईल. २.५ एकरजवळची ६७ एकर जमीन १९९३ मध्ये केंद्राने ताब्यात घेतली होती. सुप्रीम कोर्टाने ९ नोव्हेंबरला राममंदिर उभारणीसाठी ३ महिन्यांत ट्रस्ट स्थापण्याचे निर्देश दिले हाेते. अयोध्या जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १८ किलोमीटर दूर मशिदीसाठी जागा

  • सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार यूपी सरकारने सुन्नी वक्फ बोर्डाला ५ एकर जमीन दिली आहे. ती अयोध्या जिल्हा मुख्यालयापासून १८ किमीवर सोहावल तालुक्याच्या धन्नीपूर गावात आहे.
  • यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कॅबिनेट बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली.
  • सरकारचे प्रवक्ते श्रीकांत शर्मा यांनी सांगितले की, राज्य सरकारने केंद्राला जमिनीसाठी तीन प्रस्ताव पाठवले होते. लखनऊ हायवेलगत असलेल्या या भूखंडापर्यंत जाण्यासाठी उत्तम वाहतूक व्यवस्था उपलब्ध आहे.

केंद्रीय रिसीव्हरने ट्रस्टकडे सोपवली संपादित जमीन 

केंद्र सरकारचे रिसीव्हर एम.बी. अग्रवाल यांनी १९९३ मध्ये संपादित करण्यात आलेल्या ६७ एकर जमिनीचा ताबा विश्वस्त विमलेंद्र प्रताप मिश्रा यांच्याकडे सोपवला. या ट्रस्टचे विश्वस्त मंडळ अध्यक्षांची निवड करेल.

विश्वस्तांत महाराष्ट्राचे स्वामी गोविंददेव गिरी 

विश्वस्तांत महाराष्ट्राच्या स्वामी गोविंददेव गिरी यांचाही समावेश आहे. ते रामायण, भगवद्गीता, महाभारत व इतर पौराणिक ग्रंथांचे प्रवचन करतात. गोविंददेव गिरी हे आध्यात्मिक गुरू पांडुरंगशास्त्री आठवले यांचे शिष्य आहेत. ​​​​​​