आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामूळव्याध (मोड किंवा पाइल्स) म्हणजे गुदद्वाराच्या आतील भागास असलेल्या अशुद्ध रक्तवाहिन्यांचे सूक्ष्म जाळे तेथील आंतरवर्णासह सैल सुटते त्या वेळी हाताला कसला तरी कोंब किंवा मोड लागतो. बऱ्याचदा यामध्ये वेदना व रक्तस्राव होतो. या स्थितीलाच मूळव्याध असे म्हणतात. आयुर्वेदिक तज्ञ आणि डॉ. अबरार मुल्तानी सांगतात की, खाणेपिणे आणि जीवनशैलीमुळे अनेक लोकांना मूळव्याधीची समस्या होते. यामागे अनेक अनुवांशिकताही असू शकते.
> या आजाराच्या कारणांना फार महत्त्व आहे
मलबद्धता : हे या रोगाचे प्रमुख कारण मलप्रवृत्ती कडक होणे व त्यासाठी लावला जाणारा जोर याच्या परिणामी गुदद्वाराच्या जागी चिरा पडतात आणि हा रोग तयार होतो.
प्रवाहिका : आव मलप्रवृत्ती हे या रोगाचे दुसरे महत्त्वाचे कारण पोटात मुरडा येऊन चिकट फेसाळ मलप्रवृत्ती होणे हे प्रवाहिकेचे प्रमुख लक्षण. रुग्णाला किमान४-५ वेळा शौचास जावं लागतं. परिणामी, मोठ्या आतड्यासह गुदद्वाराची जागा अलवार होते. सुजते परिणामी गुदद्वाराच्या ठिकाणी जखमा तयार होतात.
मूळव्याधचा त्रास : बहुतांश मूळव्याध असणाऱ्या रुग्णांना फिशरचा त्रास दिसून आलेला आहे. मूळव्याधीची गाठ व सोबत मलबद्धता परिणामी फिशर उत्पन्न होताना दिसून येते.
> प्रसूतीच्या वेळी गुदमार्ग ताणला जाऊन व्रण होणे.
> मूळव्याध शस्त्रकर्म करताना चुकीने व्रण होणे.
जाणून घ्या डॉक्टर मुल्तानी यांनी सांगितलेले आयुर्वेदिक उपाय...
> कडूलिंबाचे पानं तुपामध्ये भाजून त्यामध्ये थोडेसे कापूर टाकून मूळव्याधीच्या कोंबावर लावा.
> अर्धा चमचा हरड पावडर रोज कोमट पाण्यासोबत घेतल्याने मूळव्याध्याच्या समस्येत फायदा होतो.
> रुईच्या दुधामध्ये हळद पावडर मिसळून कोंबावर लावा. काही दिवसांत हे सुकून खाली पडेल.
> मिरपूड आणि काळ्या जिऱ्याची अर्धा चमचा पावडर रोज मधासोबत घेतल्याने मूळव्याधीपासून आराम मिळतो.
> दुधी भोपळ्याची पाने बारीक करून मूळव्याधीच्या कोंबावर नियमित लावल्याने काही दिवसातच फायदा मिळतो.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर काही खास उपाय...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.