पचनसंस्था कार्यक्षम ठेवतील हे साधेसोपे घरगुती उपाय

आयुर्वेदामध्ये पचनसंस्था कार्यक्षम राहण्यासाठीच्या अतिशय साध्या-सोप्या बाबी सांगण्यात आल्या आहेत. येथे जाणून घ्या काही सोपे घरगुती उपाय...

दिव्य मराठी

Apr 21,2019 12:05:00 AM IST

आयुर्वेदामध्ये पचनसंस्था कार्यक्षम राहण्यासाठीच्या अतिशय साध्या-सोप्या बाबी सांगण्यात आल्या आहेत. सध्या कोणत्याही ऋतूमध्ये भूक मंदावल्याच्या तक्रारी सर्रास ऐकू येतात. येथे जाणून घ्या, पचनक्रिया आणि भुकेशी संबधित समस्या दूर करण्याचा रामबाण उपाय....

- जेवणात पातळ अन्नपदार्थांचा समावेश करा. यामुळे जेवण लवकर पचते.
- जेवणानंतर एक चमचा हिंग्वाष्टक चूर्ण घ्या. पचनक्रिया सुधारते.


- एक ग्लासभर ताकाचे सेवन करा. यामुळे पचनशक्ती वाढते.
- जेवल्यानंतर काही काळ वज्रासनात बसा. जेवल्यानंतर करता येणारे हे एकमेव आसन आहे.


- जेवणापूर्वी एक तास पंचसकार चूर्ण गरम पाण्यासोबत घ्या. याने भूक चांगली लागते.
- रात्री ३ भाग आवळा, २ भाग हरड व १ भाग बेहडा चूर्ण गरम पाण्यासोबत घ्या. जठराग्नी प्रदीप्त होतो.

X