आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आयुवेर्दिक उपायांमुळे तणाव होईल दूर, शरीराचे होणार नाही नुकसान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तणावामुळे आपल्या शरीराचे खूप नुकसान होते. यामुळे शरीरात पित्त, कफ आणि वाताचे संतुलन बिघडते. शिवाय अॅलर्जी, दमा, रक्तातील लाल पेशींमध्ये वाढ, उच्चदाब यांसारख्या समस्या उद्भवतात. काही आयुर्वेदिक औषधींच्या सेवनाने तणावापासून मुक्ती मिळवता येऊ शकते. जाणून घेऊया कोणत्या आयुर्वेदिक उपायांद्वारे दूर करता येईल तणाव... 


ब्राह्मी : ब्राह्मी तणाव निर्माण करणाऱ्या लाल पेशी कमी करण्याचे काम करते. ही तणावाच्या प्रभावावर प्रतिक्रियात्मक कारवाई करण्यासाठी ओळखली जाते. ब्राह्मी मेंदूला शांत ठेवण्यासोबतच एकाग्रता वाढवण्यात मदत करते. 


भृंगराज : भृंगराज मेंदूला निरंतर ऊर्जा देण्याचे काम करतो. यामुळे मेंदूतील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. भृंगराज मेंदूला शांत ठेवून पूर्ण शरीराला आराम पोहोचवतो. 


जटामासी : जटामासी अँटी स्ट्रेस हर्बच्या रूपात प्रसिद्ध आहे. तणाव दूर करण्यासाठी जटामासीच्या मुळांचा उपयोग केला जातो. यामुळे मेंदूला नवी चालना मिळण्यास मदत होते. 


अश्वगंधा़ : अश्वगंधा हे अॅमिनो अॅसिड्स आणि व्हिटॅमिन्सचे चांगले मिश्रण आहे. याच्या सेवनाने मेंदूमध्ये नवी ऊर्जा निर्माण होते आणि शरीर बळकट होण्यामध्ये मदत होते. 

बातम्या आणखी आहेत...