आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डायबिटीज नियंत्रित ठेवण्यासाठी रामबाण ठरतील हे आयुर्वेदिक उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डायबिटीज असल्यास शरीरात ग्लूकोज आणि इन्सुलिनचे संतुलन ठेवणे हे एक मोठे आव्हान आहे. यामुळे पाचक ग्रंथी फिट राहणे डायबिटिक लोकांसाठी जास्त महत्त्वाचे आहे. मधुमेहापासून बचावासाठी काही आयुर्वेदिक उपायांचा अवलंब केल्यास लवकर फायदा होऊ शकतो. येथे जाणून घ्या, डायबिटीज कंट्रोल करणारे काही खास आयुर्वेदिक उपाय.


वटवृक्षाची साल
वटवृक्षाच्या सालीला पाण्यात टाकून उकळा, या पाण्याला सकाळी आणि संध्याकाळी प्या. याला महिनाभर प्यायल्यास मधुमेह मुळातून संपतो. जवसाची भाकरी खाल्ल्यानेही मधुमेहाच्या रुग्णांना फायदा होतो. 


काळे मिरे
काळे मिरे आणि काळ्या मिठाला पाणी टाकून खडबडीत वाटून घ्या. याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून सकाळी-संध्याकाळी पाण्यासोबत घ्या. काही दिवसांतच रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते. 


मध
हळद पावडरमध्ये मध मिसळून रोज घेतल्याने मधुमेह िनयंत्रणात राहतो. याप्रकारे कडूलिंबाच्या सालीचा काढा आणि कारल्याचा आणि आवळ्याचा रसदेखील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करतो.  


त्रिफळा चूर्ण
मधुमेही रुग्णाने रोज जेवणानंतर गरम पाण्यासोबत त्रिफळा चूर्ण घ्यावे. याशिवाय पंच साकार चूर्णासोबत जांभळाच्या बियांची पावडर गरम पाण्यासोबत प्यायल्यास फायदा होतो.


जांभळाच्या बियांचे चूर्ण, सुंठ आणि अडुळसा वाटून घ्या. याला कपड्याने गाळून घ्या. याला अॅलोवेराच्या रसात मिसळून छोट्या छोट्या गोळ्या बनवा. १-१ गोळी दिवसातून तीन वेळा मधासोबत घ्या.

बातम्या आणखी आहेत...