आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ayush Is Learning Mixed Martial Arts For The Movie 'Quatha'; Training At Tiger's Gym

चित्रपट ‘क्वाथा’साठी मिक्स्ड मार्शल आर्ट्स शिकतोय आयुष; टायगरच्या जिममध्ये घेतोय प्रशिक्षण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क - आयुष शर्मा सध्या आगामी चित्रपट ‘क्वाथा’साठी तयारी करत आहे. तो यासाठी आपल्या पात्रावर खूपच मेहनत घेत आहे. प्रेक्षकांना ही भूमिका वास्तविक वाटावी म्हणून यासाठी मेहनत घेत आहे. आयुष या चित्रपटात आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे आयुष जास्त हार्ड वर्क करणार आहे. यासाठी त्याने स्वत:च प्लॅन तयार केला आहे. स्वत:ला त्याच्या ढाच्यात बसवण्याचा प्रयत्न करणार आहे. या चित्रपटात तो स्वत:च स्टंट करत असल्याचे ऐकले आहे. यासाठी तो मिक्स्ड मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेत आहे. 
 
‘मिक्स्ड मार्शल आर्ट्ससाठी शिस्त आणि कठोर मेहनतीची गरज असते. आपल्या पात्रासाठी मी ते सर्व करू इच्छित आहे, जे गरजेचे आहे. माझे पात्र एका आर्मी अधिकाऱ्याचे आहे, तो शिस्तप्रिय आहे. निडर आहे आणि एका योद्ध्याप्रमाणे लढतो. मिक्स मार्शल आर्ट्समुळे मला अॅक्शन आणि शिस्त उत्तम पद्धतीने समजण्यास मदत मिळत आहे.
 

टायगरच्या जिममध्ये घेतोय प्रशिक्षण
मिक्स्ड मार्शल आर्ट््सच्या प्रशिक्षणासाठी आयुषने टायगर श्रॉफच्या जिमची निवड केली. तो रोज टायगरच्या फिटनेस ट्रेंनिग सेंटर एमएमएमध्ये वर्गात हजेरी लावत आहे.