आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ayush Sharma Shared Photos Of His Baby Girl Ayat Sharma For The First Time On Social Media

अर्पिता खानची मुलगी आयतचे पहिल्यांदाच फोटो आले समोर, पती आयुषने लिहिली इमोशनल पोस्ट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेता सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता खान शर्मा ही 27 डिसेंबर रोजी दुस-यांदा आई झाली. अर्पिताने गोंडस मुलीला जन्म दिला. अर्पिता आणि तिचा पती आयुष यांनी त्यांच्या लाडक्या लेकीचे नाव आयत शर्मा असे ठेवले आहे. आयतच्या जन्माच्या चार दिवसांनी आयुष शर्माने तिची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. आयुषने आयतचे चार फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात आयत, आयुष आणि अर्पितासह चिमुकला आहिलदेखील दिसतोय. आयतचे अतिशय गोंडस रुप बघायला मिळत आहे. फोटो शेअर करुन आयुषने इमोशनल पोस्टदेखील लिहिली. तो मुलगी आयतला उद्देशून म्हणतो, "या सुंदर जगात तुझे स्वागत आहे, तू आमच्या सर्वांच्या जीवनात खूप आनंद आणला आहे. आशा आहे की, तू भविष्यात देखील आमचे जीवन आनंदाने आणि उत्साहाने पूर्ण करशील. ''

सलमानसाठी अतिशय खास ठरला वाढदिवस:
अर्पिता आणि सलमानमध्ये अतिशय स्पेशल बाँडिंग असल्याचे सगळ्यांनाच ठाऊक आहे. स्वतः अर्पिताने भावाला त्याच्या वाढदिवसाला अनोखी भेट देण्याचं आधीच ठरवलं होतं. अर्पिताने ठरवल्याप्रमाणे 27 डिसेंबर रोजी सलमानच्या वाढदिवशी आयतचा जन्म झाला. अर्पिताने मुलीला सी-सेक्शनने आयतला जन्म दिला.  हिंदूजा रुग्णालयात अर्पिताची प्रसुती झाली. अर्पिताच्या प्रसुतीमुळे सलमानने यंदाचा आपला वाढदिवस मुंबईतच साजरा केला. सलमानच्या पाली हिलस्थित घरी हे सेलिब्रेशन झाले. बॉलिवूडमधील अनेक सेलेब्स या पार्टीला उपस्थित होते.