आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 रुपयांमध्ये बनवा हे कार्ड, मोफत होतील 5 लाखांपर्यंतचे उपचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली | अवघ्या 30 रुपयांचे कार्ड बनवून तुम्ही 5 लाखांपर्यंत उपचार फ्रीमध्ये करु शकता. हे कार्ड साधेसुधे नाही. या कार्डचे नाव गोल्डन कार्ड आहे, हे आयुष्मान भारत स्कीमशी जोडले आहे. या स्कीममध्ये शामिल झालेल्या प्रत्येक व्यक्तीला हे कार्ड बनवणे आवश्यक आहे. कार्ड बनवल्यानंतरच तुम्ही उपचार घेऊ शकता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 23 सप्टेंबर रोजी आयुष्मान भारत योजना लाँच केली. या योजनेत 10 कोटी कुटूंबातील जवळपास 50 कोटी लाकांचा समावेश आहे. यांना 5 लाख रुपयांपर्यंत उपचार फ्रीमध्ये मिळतील. 

 

गोल्डन कार्ड दोन ठिकाणी तयार होतील. हॉस्पिटलमध्ये आणि कॉमन सर्विस सेंटर येथे सीएससी गावांमध्ये हे सहज मिळते. सीएससीचे सीईओ डी.सी. त्यागींने आमच्या वेबसाइटला सांगितले की, कॉमन सर्विस सेंटरवर गोल्डन कार्ड बनवण्याची तयारी पुर्ण झाली आहे. पुढच्या आठवड्यात कार्ड बनवण्याचे काम सुरु होईल. कार्ड बनवण्याच्या बदल्यात 30 रुपये घेतले जातील. कार्ड लॅमिनेट करुन दिले जाईल. स्कीममध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीने आयुष्मान भारतच्या सूचीमध्ये आपले नाव तपासून घ्यावे. नाव असल्यावर त्यांचे कार्ड बनवण्यात येईल. त्याने सांगितले की, जर एका कुटूंबात पाच व्यक्ती असतील तर सर्वांचे वेगवेगळे कार्ड बनवले जातील. हॉस्पिटलमध्ये हे कार्ड फ्रीमध्ये तयार केले जाईल. लोक हे आजारी पडण्यापुर्वीच हॉस्पिटलमध्ये जातात. यामुळे हे कार्ड आजारी पडण्यापुर्वी बनवावे लागेल. यासाठी तुम्हाला सीएससीला जावे लागेल. गावातून हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी 50-100 रुपये खर्च होतील. रेणु देवी नावाच्या महिलेने पहिले गोल्डन कार्ड बनवले.


मुख्य आजार, लाभार्थी रुग्णांना योजनेत उपचार करता येणार 
बायपास शस्त्रक्रिया, मोतीबिंदू, कॉर्नियल ग्राफ्टिंग, ग्लुकोमा शस्त्रक्रिया, ऑर्थोप्लास्टी. छातीतील फ्रॅक्चर, युरॉलॉजिकल शस्त्रक्रिया, सिझेरियन प्रसूती, अॅपेंडिक्स, हर्नियाची शस्त्रक्रिया, डायलिसिस, स्पाइन शस्त्रक्रिया, ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रिया, नवजात मुलांमधील उत्सर्जनासंबंधी उपचार, कर्करोगात किमोथेरपी व रेडिआेथेरपी, ल्युकेमिया शस्त्रक्रिया.


 

 

 

बातम्या आणखी आहेत...