आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ayushman Gave Voice To A Character Called 'Pooja', After Learning The Speaking Style Of Women In Mathura,

मथुरेतील महिलांच्या बोलण्याची शैली शिकून आयुष्मानने दिला 'पूजा' नावाच्या पात्राला आवाज 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : आयुष्मान खुराणाचा आगामी चित्रपट 'ड्रीम गर्ल'चे ट्रेलर सोशल मीडिया ट्रेंडिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर कायम आहे. या सोशल-कॉमेडी चित्रपटात तो सीता आणि द्रौपदीचे पात्र साकारताना दिसेल. याशिवाय तो या चित्रपटात पूजा नावाची महिला साकारत तिचा आवाज काढूनही अनेक लोकांना मूर्ख बनवणार आहे. हे पात्र साकारण्यासाठी त्याने कमीत कमी २ ते ३ तासांचा वेळ घेतला होता. तसेच एका महिलेचा आवाज काढण्यासाठीही आयुष्मानला खूप मेहनत घ्यावी लागली. 
 
02 दिवसांचा वेळ घेतला होता व्हॉइस मॉड्युलेशनसाठी 
03 तास लागले महिलेच्या लूकमध्ये येण्यासाठी 
12 साड्या वापरून पाहिल्या निर्मात्यांनी योग्य लुकसाठी 
 

व्हॉइस मॉड्युलेशनसाठी घेतला दोन दिवसांचा अवधी...  
- या चित्रपटात तो पूजा नावाच्या युवतीचा आवाज काढतो. दिग्दर्शक राज शांडिल्यने सांगितले, यासाठी खास तयारी केली होती.
- चित्रपटाची पार्श्वभूमी मथुरा असल्याने सर्वात आधी तेथील महिला आणि त्यांच्या शैलीवर काम करण्यात आले. 
- आयुष्मानने पाकिस्तानी कलावंतांशिवाय एखाद्या पुरुष पात्राने महिलेचा आवाज काढलेले व्हिडिअोदेखील पाहिले. 
- शैली पकडल्यानंतर आयुष्मानने पूजाचा आवाज काढला. 
- आधी महिलांसारखे फील केले जावे, त्यानंतरच त्यांचा आवाज काढला जावा, यावर अधिकाधिक भर देण्यात आला. 
- सातत्याने व्हिडिअोज पाहिल्यानंतर आणि सराव केल्यानंतर आयुष्मानने ती शैली पकडली आणि त्याने महिलांच्या आवाजामध्ये बोलण्यास सुरुवात केली. 
- या प्रक्रियेला दोन दिवस लागले. यादरम्यान अनेक आवाजांची चाचणी घेण्यात आली. पूर्णपणे महिलेचाच आवाज बाहेर येऊ नये याचीदेखील काळजी घेण्यात आली. 
 

लूक...  
- साडी नेसून पूर्णपणे तयार होण्यासाठी आयुष्मानला २ ते ३ तासांचा वेळ लागत होता. 
- आयुष्मान हा सीता आणि द्रौपदीच्या गेटअपमध्ये दिसणार आहे. यासाठी निर्मात्यांनी त्याला एक डझनापेक्षा जास्त साड्या घालायला लावल्या. 
- आयुष्मानला साडी नेसवण्याचे काम त्याचे मेकअप मॅन करत होते. यादरम्यान दोन ते तीन सहायकांची मदत घ्यावी लागत होती. दोन ते तीन तासांचा वेळही लागत होता. 
- सर्वात आधी मेकअप केला जायचा, नंतर साडी घातली जात होती. यानंतर नाकावर नथ आणि लिपस्टिक लावली जात होती. कपाळावर मळवटही भरला जात होता. 
 

उपस्थिती...  
- लूकमध्ये आल्यानंतर मुलींप्रमाणे चालणे आणि अभिनय करणे आयुष्मानसाठी गरजेचे होते. 
- या कामात आयुष्मानची मदत त्याची सहकलाकार नुसरत भरुचाने केली. साडी घालून कसे चालावे, हे तिने शिकवले. 
- जोपर्यंत परफेक्ट महिलेप्रमाणे चालता येत नाही तोपर्यंत आयुष्मान सराव करत राहिला. 
- आयुष्मानला आपल्या पात्रासाठी हिल असलेली सँडल घालावी लागली नाही. त्यामुळे त्याला थोडा दिलासा मिळाला. 
 

व्हॉइस मॉड्युलेशन...  
यासाठी आयुष्मानने खास व्हॉइस मॉड्युलेशन केले. तो रेडिअो जॉकी असताना असे करत असे. 
त्या काळात आयुष्मान हा आवाज स्टुडिअोमध्ये माइकच्या मागून काढत होता. इथे त्याला कॅमऱ्यासमोर हावभावही करायचे होते. 
 
चित्रपटातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आयुष्मानला महिलेचा आवाज काढायचा होता. 
आयुष्मान म्हणतो, कॅमऱ्यासमोर आवाज काढताना घशात थोडी खवखव व्हायची, परंतु मी स्टुडिअोमध्ये डबिंग करतो तेव्हा तोच आवाज चांगला निघतो. 
 

शाळेत काढायचो मुलीचा आवाज...  
आयुष्मान सांगतो, 'मी आणि माझा एक मित्र शाळेत असताना आम्ही दोघेही मुलींच्या आवाजात फोन करत होतो. एखाद्या वेळी प्रेयसीच्या घरी फोन लावला आणि तो काकांनी उचलला तेव्हा आम्ही मुलींच्या आवाजात बोलत होतो, जेणेकरून त्यांना शंका येणार नाही. 
 

अश्लील होऊ दिले नाही टेली कॉलिंग कन्व्हर्सेशन...  
राज म्हणतो, 'आयुष्मान हा पूजा नावाच्या पात्राचा आवाज काढून इतर पुरुषांसोबत बोलत असतो. यादरम्यान संवाद अश्लील होऊ दिला नाही. कारण हा चित्रपट कुटुंबाचा विचार करून तयार केला. कॉलिंगदरम्यान अनेक मुद्द्यांवर कटाक्ष टाकला.

बातम्या आणखी आहेत...