Home | News | Ayushman Khurana ask for support on social media to file petition putting ban on caste words

जातिसूचक शब्द बॅन करण्यासाठी आयुष्मान दाखल करणार पिटीशन, सोशल मीडियावर मागितला सपोर्ट

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 18, 2019, 11:57 AM IST

सत्य घटनेवर आधारित आहे चित्रपट... 

 • Ayushman Khurana ask for support on social media to file petition putting ban on caste words

  बॉलिवूड डेस्क : आयुष्मान खुराना आपला चित्रपट 'आर्टिकल-15' सोबत समाजमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहे. संविधानातील कलम 15 मधील समानतेचा अधिकार लोकांना समजावण्यासाठी आयुष्मानने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो खालच्या जातीच्या लोकांसाठी वापरण्यात येणार एक शब्द 'भंगी' वर बॅन लावण्याचे एक पिटीशन फाइल करण्याची अपील करत आहे. चित्रपट 'आर्टिकल-15' 28 जूनला रिलीज होणार आहे.

  काय आहे या व्हिडिओमध्ये...
  आयुष्मान खुरानाने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हडिओमध्ये पोलीस स्टेशनमध्ये एक चहावाला येतो. ज्याचा चहा पिऊन हवलदार म्हणतो, 'कितनी भंगी चाय बनाया रे.' तर यावर आयुष्मान म्हणतो, 'किती खराब चहा होता, किती भंगी चहा होता. आपण किती सहज म्हणतो हे. ही शिवी एका जातीची ओळख बनली आहे. 'आर्टिकल-15' म्हणते कोणत्याही प्रकारचा भेदभाव गुन्हा आहे. थांबवा याला माझ्यासोबत. एका पिटीशनवर साइन करून, जेणेकरून भंगी शब्दावर बॅन लावला जाऊ शकेल.

  सत्य घटनेवर आधारित आहे चित्रपट...
  चित्रपटाची कथा उत्तरप्रदेशच्या बदायूंमध्ये झालेल्या रेप आणि हत्येच्या घटनेवर आधारित आहे. या घटनेमध्ये दोन दलित अल्पवयीन मुलींवर गँगरेप करून नंतर हत्या केली गेली होती. या घटनेचा देशात आणि परदेशातही खूप निषेध झाला होता. ही घटना 27 मेची होती त्यामुळे मेकर्सने या चित्रपटाचा टीजर 27 मेला प्रदर्शित केला होता. या टीजरमध्ये आयुष्मान खूप इंटेस लुकमध्ये दिसतो आहे.

Trending