आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्क : नुकत्याच रिलीज झालेल्या 'ड्रीम गर्ल'च्या माध्यमातून लागोपाठ सहावा हिट चित्रपट दिल्यानंतर आयुष्मान खुराणादेखील आता प्रॉफिट शेअरिंग स्टार्सच्या क्लबमध्ये सहभागी झाला आहे. ही माहिती त्याने स्वत: दैनिक दिव्य मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहे. आयुष्मानने सांगितले, 'मी याची सुरुवात केलेली आहे. माझ्या मते, जर मूळ मानधन कमी असेल तर प्रॉफिट शेअरिंग घेता येऊ शकते. अनेकदा ही शेअरिंग एकापाठोपाठ एक चित्रपटावरही अवलंबून असते. तसेच निर्मात्यांसोबत तुमचा ताळमेळ कसा आहे, स्क्रिप्टची काय मागणी आहे, यावरही ती अवलंबून असते. जर स्क्रिप्टनुसार चित्रपटाच्या निर्मितीवर जास्त खर्च येणार असेल तर त्या वेळी स्टार्स मानधनाऐवजी प्रॉफिट शेअरिंग घेतात.'
30 टक्क्यांपर्यंत घेणार शेअरिंग
ही माहिती देताना आयुष्मानने हेदेखील सांगितले की, 'अंधाधुन'च्या वेळेपासूनच प्रॉफिट शेअरिंग घेत आहे. तथापि, यासंदर्भात आतापर्यंत कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती आणि याबाबत कुणालाही कोणतीच माहिती नव्हती.' तथापि, आपण एका चित्रपटासाठी किती टक्के प्रॉफिट शेअरिंग आकारणार, हे आयुष्मानने अद्याप सांगितलेले नाही.
काय होतो फायदा
- मानधनाच्या या मॉड्यूलचा निर्मात्यांना फायदा होतो. त्यांच्यावर स्टार्सच्या मनमानी मानधनाचा दबाव नसतो.
- निर्मात्यांना बजेटचा मोठा भाग चित्रपटाच्या निर्मितीमध्ये गुंतवणे शक्त होते.
- एक दर्जात्मक चित्रपट बनतो आणि नंतर प्रॉफिट सर्वांमध्ये विभागले जाते.
कुणाची किती प्रॉफिट शेअरिंग?
आमिर खान
- एकूण बजेटच्या ८० टक्क्यांपर्यंत
सलमान खान
५० टक्के आकारतो. सोबतच डिजिटल अधिकारही घेतो.
अक्षय कुमार
६० टक्के आकारतो. उर्वरित डिजिटल आणि सॅटेलाइट अधिकारांशी त्याला देणे-घेणे नसते. दिवसाला एक कोटी आकारूनही प्रकरण निकाली काढतो.
शाहरुख आणि अजय देवगण
सहनिर्माते म्हणून बोर्डावर येतात.
हृतिक रोशन
मानधन ४० कोटींच्या आसपास किंवा ४८ टक्के प्रॉफिट शेअर.
आयुष्मानच्या चित्रपटांची कमाई
ड्रीम गर्ल ७७.५० कोटींपेक्षा जास्त
आर्टिकल १५ - ६५.४५ कोटी
बधाई हो - १३७.६१ कोटी
अंधाधुन - ७४.५९ कोटी
शुभमंगल सावधान - ४३.११ कोटी
बरेली की बर्फी - ३४.५५ कोटी
अभिनेत्रींबाबत बोलायचे झाल्यास या यादीमध्ये दीपिका पदुकोण, प्रियंका चोप्रा आणि अनुष्का शर्मा आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.