आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ayushman Khurana Said, 'If The Father Had Not Throw Me Out At The Right Time, I Would Not Have Reached Here'

आयुष्मान खुराणा म्हणाला, 'वडिलांनी योग्य वेळी घराबाहेर काढले नसते तर येथपर्यंत पोहोचलो नसतो'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा : पाटणा येथे भास्कर उत्सवाच्या चौथ्या दिवशी प्रेक्षकांनी सिने अभिनेता आयुष्मान खुराणा आिण जितेंद्र कुमार यांच्यासोबत जोरदार धमाल केली. गच्च भरलेल्या बापू सभागृहात अॅक्शन, इमोशन, डान्स, ड्रामा अशी धूम होती. ठराविक मध्यमवर्गीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेल्या या दोघांनी आपल्या खासगी जीवनाचे एक-एक पैलू उलगडले तसे उपस्थित लोकांना जणू अापणच त्यांच्या जागी आहोत, असे वाटू लागले. आयुष्मानने सांगितले, २००६ मध्ये जेंव्हा एम.ए. पूर्ण केले तेव्हा, 'जा, तुझे स्वप्न पूर्ण कर' म्हणत वडिलांनी घरातून बाहेर काढले. आयुष्मान म्हणाला, पापांनी योग्य वेळी घराबाहेर काढले नसते तर आज मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. तुला हे सगळे कसे शक्य होते, असे विचारल्यावर आयुष्मान म्हणाला, 'तुम्हा लोकांत वावरतो, जगतो तेव्हा आपोआपच समाज काय ते समजते.'