आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ayushman Khurana Says It Is Your Responsibility To Bring Viewers To The Theater By Providing Quality Content

आयुष्मान खुराना म्हणाला - क्वालिटी कन्टेन्ट देऊन दर्शकांना थिएटरपर्यंत आणण्याची जबाबदारी आपली आहे 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : डिजिटल प्लॅटफॉर्मवर वेब शोजच्या वाढत्या प्रदर्शनामुळे चित्रपटगुहांमध्ये प्रेक्षकांची संख्या कमी होत चालली आहे. या मुद्द्यावर इंडस्ट्रीतील लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. पण आयुष्मान खुरानाचे म्हणणे आहे की, खरच चित्रपटगृहांमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. तो म्हणतो, उत्तम ओटीटी कंटनेटच्या या काळामध्ये प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यकान्त अनु इच्छितो. जे आजकाल कमी होत आहे. लोक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मडावरे वेगवेगळ्या कन्टेन्टचा आनंद घेत आहेत. अशात आपल्यासारख्या अभिनेत्यांना गरज आहे की, आपण चांगले सिनेमे बनवावे, जे लोकांना चित्रपटगृहांपर्यंत खेचून आणतील. 
 

 

माझे चित्रपट लोकांना वेगळा अनुभव देत आहेत - आयुष्मान... 
आयुष्मान पुढे म्हणाला, 'संयोगाने माझे चित्रपट लोकांना वेगळा अनुभव देत आहेत. मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की, लोकांनी मला विशेष सिनेमांसोबत ओळखायला सुरुवात केली आहे. आता लोक माझ्याकडून केवळ चांगल्या चित्रपटांचीच अपेक्षा करतात आणि मी या जबाबदारीने खूप खुश आहे. यामुळे सतत उत्तम प्रकारच्या प्रोजेक्ट्सच्या शोधात मी असतो.' 

 

माहित नाही सुरक्षित चित्रपट कशाला म्हणतात - आयुष्मान... 
आर्टिकल 15 च्या यशाने खुश असलेल्या आयुष्मानसाठी योग्य स्क्रिप्टची एक वेगळी व्याख्या आहे. तो म्हणतो, माझ्या कॅरिअरमध्ये मी कधी सेफ स्क्रिप्टची निवड केली नाही. मला माहीतच नाही की, सेफ फिल्म कशाला म्हणतात. मी नेहमीच काहीतरी वेगळे करण्याची जोखीम घेत आलो आहे. करणी मी स्क्रिप्ट आणि कथा मनापासून निवडतो.