आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेजच्या दिवसांमध्ये ट्रेनमध्ये गिटार वाजवून पैसे कमवायचा आयुष्मान खुराना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : राष्ट्रीय पुरस्कार विजेता आयुष्मान खुराणा नुकताच सहकलाकार नुसरत भरूचासोबत 'द कपिल शर्मा शो'मध्ये आगामी चित्रपट 'ड्रीम गर्ल'चे प्रमोशन करण्यासाठी आला होता. या वेळी आयुष्मान आणि नुसरतने आपल्या खासगी आयुष्याचे काही रंजक किस्से शेअर केले. आयुष्मानने याप्रसंगी सांगितले की, संघर्षाच्या काळात मी आपल्या मित्रांसोबत ट्रेनमध्ये गिटार वाजवून आणि गाणी गात पैसे कमावत होतो.
 
 

एका दिवसात 1000 रुपये कमवले... 
झाले असे की, कपिल शर्माने या घटनेला अफवा म्हणत आयुष्मानकडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. उत्तरात तो म्हणाला, "हो, हे खरे आहे की, कॉलेजच्या दिवसांमध्ये मी आणि माझे मित्र चंदीगड इंटरसिटी ट्रेनमध्ये प्रवास करायचो. तिथे आम्ही गिटार वाजवायचो आणि गाणी म्हणायचो. या प्रवासादरम्यान मी गिटार वाजवत गाणी गात होतो. अनेकदा लोक प्रभावित व्हायचे तेव्हा ते मला पैसे द्यायचे. आम्ही एका दिवसात 1000 रुपये कमवले होते." आयुष्मानने हेदेखील म्हणाला की, अनेकदा मित्रांसोबतचा त्याचा गोव्याचा टूरही याच पैशामधून व्हायचा. 
 
 

नुसरतबद्दलची अफवा... 
एपिसोडदरम्यान कपिलने नुसरत भरूचाबद्दलची एक अफवादेखील सांगितली. त्याने अभिनेत्रीला विचारले की, ती आपल्या पालकांचे एकुलते एक अपत्य आहे का ? उत्तर हो म्हणून मिळाले तर कपिल म्हणाला की, तिच्याबद्दल अफवा आहे की, ती 15 वर्षांची होईपर्यंत आपल्या आईवडिलांसोबत झोपायची. त्यामुळेच तिला कुणी भाऊ बहीण नाहीये. हे ऐकून नुसरत जोरजोरात हसली. नुसरतने स्वस्थ आणि चमकत्या त्वचेचे रहस्य सांगितले, ती म्हणाली की, तिला पांढरी कॉफी खूप आवडते. 

बातम्या आणखी आहेत...