आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ayushman Khurana To Play The Role Like 'Zanjeer' And 'Shoul' In Film 'Article 15'

'आर्टिकल 15'मध्ये 'जंजीर' आणि 'शूल'च्या नायकाप्रमाणे भूमिका साकारणार आहे आयुष्मान खुराणा 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : आयुष्मान खुराणाचा आगामी चित्रपट 'आर्टिकल 15' आहे. यामध्ये तो आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदा एका इन्सपेक्टरच्या भूमिकेत दिसेल. यामध्ये आयुष्मान पूर्णपणे एका गंभीर पोलिस अधिकाऱ्याचे पात्र साकारेल. दिग्दर्शक अनुभव सिन्हानेही हे पात्र इतर पात्रांपेक्षा वेगळे आणि गंभीर ठेवले आहे. आयुष्मानलाही अशाच पात्राची प्रतीक्षा होती. त्याला पडद्यावर असाच एक पोलिस अधिकारी साकारायचा होता. त्याला 'जंजीर'मधील अमिताभ बच्चन आणि 'शूल'मधील मनोज बाजपेयीवाल्या पोलिसाचे पात्र पसंत आहे. त्यामुळे तो या चित्रपटात अशा प्रकारचे पात्र साकारू इच्छित होती. 

 

आयुष्मानदेखील यामध्ये उच्च जातीमधील बलात्काराचे आरोपी असलेल्या दबंग लोकांशी सामना करताना दिसेल. परिणामी आफले पात्र गंभीर असावे, असे त्याला आधीपासूनच वाटत होते. 

बातम्या आणखी आहेत...