आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ayushman Khurana Works With The Government And UNICEF On Child Sexual Abuse; Campaign To Raise Awareness

आयुष्मान खुराणा बाल लैंगिक अत्याचाराविरोधात सरकार आणि युनिसेफसोबत करणार काम; जनजागृतीसाठी राबवणार मोहीम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क - आयुष्मान खुराणा आपल्या सामाजिक विषयांवरील चित्रपटांसोबत सामाजिक मुद्द्यांशी निगडीत मोहिमांमध्ये सहभागी होत आहे. त्याने सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालय आणि यूनिसेफसोबत हाथ मिळवणी केली. याअंतर्गत लैंगिक अपराध प्रतिबंधक कायदा (पॉक्सो) अंतर्गत बाल लैंगिक अपराधांविरुद्ध संरक्षण आणि कायदेशीर मदती प्रती जन जागृतता अभियान चालवणार आहे. 

अशाप्रकारे करणार काम : 
आयुष्मानने या संबंधीत नुकताच एक व्हिडिओ चित्रित केला आहे. या व्हिडिओत त्याने अशा प्रकारच्या क्रूर गुन्ह्यांविरुद्ध अधिक जागरूक राहण्याची आणि योग्य अधिकार्‍यांकडे तक्रार करून अशा गुन्ह्यांविरुद्ध आवाज उठवण्याची विनंती केली आहे.

आयुष्मान म्हणाला हे महत्वपूर्ण पाऊल
याविषयी बोलताना आयुष्मानने सांगितले की, "सामाजिकदृष्ट्या जागरूक नागरिक म्हणून मला नेहमीच महत्वपूर्ण आणि त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता असलेल्या अशा प्रकरणांबाबत चर्चा करणे आणि माहिती देणे आवडेल. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पीओसीएसओ) आणि बाल लैंगिक अत्याचाराविरूद्ध संरक्षण आणि कायदेशीर मदतीबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी  मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लहान मुलांवरील अशाप्रकारचे अपराध अत्यंत घृणास्पद आहे. मी सरकार आणि युनिसेफद्वारे भावी पिढीच्या संरक्षणासाठी घेतलेल्या या चरणांचे मी कौतुक करतो."

> पॉक्सो, हिंसक वर्तनापासून मुलांचे संरक्षण करेल. या मोहिमेचे उद्दीष्ट सोशल मीडिया, टीव्ही आणि सिनेमा हॉलद्वारे सर्व भारतीयांपर्यंत पोहोचवणे हे आहे आणि आयुष्मान सर्व टप्प्यांत त्याचे समर्थन करेल.