Bollywood / आयुष्मान खुराणाच्या आगामी 'बाला' चित्रपटाचा टीजर रिलीज, टक्कल पडलेल्या व्यक्तीचे पात्र साकारतोय आयुष्मान

आयुष्मानने स्वतः शेअर केला त्याच्या आगामी चित्रपटाचा टीजर 

Aug 26,2019 06:26:40 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : एकीकडे आयुष्मान खुराणाचा चित्रपट 'ड्रीम गर्ल' चा बोलबाला असतानाच आता आयुष्मान खुराणाच्या आणखी एका चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आहे. आयुष्मानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचा आगामी चित्रपट 'बाला' चा टीजर शेअर केला आहे. आयुष्मानने टीजर शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले, "आता वेळ आहे थोडा बोल्ड.... नाही.. बाल्ड मूव्ह्ज करण्याची." अशातच आयुष्मान लॅक्मेच्या फॅशन विकमधेही रॅम्पवॉक करताना दिसला होता.

पाहा आयुष्मानच्या चित्रपटाचा टीजर...

#lakmefashionweek

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk) on

X